कृषी कायदे रद्द : शेवगावमध्ये फटाके वाजवत जल्लोष

कृषी कायदे रद्द : शेवगावमध्ये फटाके वाजवत जल्लोष

शेवगाव l तालुका प्रतिनिधी

मोदी सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावे लागले हा दिल्ली सीमेवर व देशभरातून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा ऐतिहासिक विजय शेवगाव येथे अखिल भारतीय किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व एस टी कामगार यांनी शहीद झालेल्या शेतकऱ्यांना अभिवादन करून व फटाके वाजवून साजरा केला.

यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसेक्रेटरी कॉ ॲड सुभाष लांडे म्हणाले भाजपला काही राज्यात पोटनिवडणुकीत बसलेले राजकीय धक्के व पुढील वर्षी होणार असलेल्या पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा व त्यानंतर गुजरात या राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असण्याची दाट शक्यता आहे.

मात्र वर्षभर चाललेल्या शेतकरी संघटननांच्या आंदोलनाचा हा विजय आहे. आंदोलनाच्या काळात शेकडो शेतकरी मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रध्दांजली वाहतो. एस.टी. कर्मचारी संपातही सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामील करून घेण्याची कार्यवाही राज्य सरकारला करावी लागणार आहे.

या वेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसेक्रेटरी कॉ ॲड सुभाष लांडे, कॉ संजय नांगरे, कॉ भगवानराव गायकवाड, हमाल माथाडी संघटनेचे एजाज काझी, किसान सभेचे बबनराव पवार, एसटी कामगार संघटनेचे दिलीप लबडे, संजय गीते लक्ष्मण लव्हाट, भानुदास बोडखे, भगवान घुले, अरुण सोलाट, सय्यद बाबुलाल आदि उपस्थित होते. संजय नांगरे यांनीही भावना व्यक्त केल्या.

तीनही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढं अखेर सरकारला झुकावं लागलं आहे. याचं सर्व श्रेय अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतही बसून राहिलेल्या आंदोलकांना द्याव लागणार आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आंदोलनासाठी जी रणनीती आखली ती पूर्ण यशस्वी ठरली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com