इंजिनिअरीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या, गळफास घेत संपवले जीवन

इंजिनिअरीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या, गळफास घेत संपवले जीवन

जामखेड | तालुका प्रतिनिधी

जामखेड (Jamkhed) शहरातील रसाळ नगर भागातील नुरानी बेकरी जवळ रहाणाऱ्या साक्षी दिलीप भोसले (वय २० वर्षे) या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीने (engineering student) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (committed suicide) केली आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

सविस्तर माहिती अशी की, रविवार (दि. १७ जुलै) रोजी सायंकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास कु. साक्षी भोसले ही घरात एकटी होती. या दरम्यान साक्षी हीने घरातील छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या नंतर तिला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Sarvamat News)

मात्र या वेळी डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले. यानंतर शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालय दाखल केले. रात्री उशिरा ग्रामीण रुग्णालयातील डॉ . शशांक शिंदे यांनी तीचे शवविच्छेदन केले.

आत्महत्या नेमकी का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मयत साक्षी ही पुणे येथील कॉलेजला इंजिनिअरिंग शिकत होती. ती जामखेड येथिल नागेश विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक दिलीप भोसले यांची मुलगी होती.

दि १८ रोजी सकाळी तीच्यावर घुमरा पारगाव ता. पाटोदा या मुळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. साक्षी हीच्या जाण्याने जामखेड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जामखेड पोलीस करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com