टाकळीभान आदिवासी स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवावे; अन्यथा उपोषण

तंट्यातात्या भिल्ल क्रांती फोर्सचा इशारा
टाकळीभान आदिवासी स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवावे; अन्यथा उपोषण

टाकळीभान | वार्ताहर

येथील आदिवासीच्या स्मशानभुमीवर गैरआदिवासींनी अतिक्रमण करुन स्मशानभुमीसाठी दिलेल्या जागेची खरेदी विक्री करीत आहेत....

टाकळीभान आदिवासी स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवावे; अन्यथा उपोषण
भयंकर! लहान मुलाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून

आदिवासींना दफनविधीसाठी जागाच नसल्याने मृत्युनंतरही आदिवासींची हेळसांड होत असल्याने या जागेवरील अतिक्रमण त्वरीत काढण्यात यावीत. अन्यथा सोमवार 12 जुलैपासुन टाकळीभान तलाठी कार्यालयासमोर भिल्ल समाज बांधव आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा तंट्यातात्या भिल्ल क्रांती फोर्सचे एकनाथ गांगुर्डे (Tantyatatya Bhil Kranti Force Eknath Gangurde) यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर (Collector Ahmednagar) यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

आदिवासिंची संख्या जवळपास 30 टक्के असल्याने व पर्यायी जागा नसल्याने मयताच्या दफनासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे आदिवासी स्मशानभुमीवर अतिक्रमण करुन बेकायदेशीर खरेदी विक्री करणार्‍यांवर अनुसुचित जाती आत्याचार आधिनियमाद्वारे गुन्हे दाखल व्हावेत, आदिवासी स्मशानभुमीसाठी आलेला निधी ग्रामपंचायतीने कुठे खर्च केला माहीती मिळावी व तातडीने अतिक्रमण हटवण्यात यावे अन्यतः सोमवार 12 जुलै रोजी टाकळीभान तलाठी कार्यालयासमोर आदिवासी बांधव आमरण उपोषण करतील, असा इशाराही गांगुर्डे यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com