सरकारी जागेत अतिक्रमण करणार्‍या ‘त्या’ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करावे

शिवसेना नेते राधाकृष्ण वाघुले यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
सरकारी जागेत अतिक्रमण करणार्‍या ‘त्या’ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करावे

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

टाकळीभान ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरकारी जागेत अतिक्रमण करुन राहणारे 10 सदस्य निवडून आलेले आहेत. ग्रामपंचायत कायद्यातील तरतुदीप्रमाणे सदस्याने सरकारी जागेवर अतिक्रमण केल्यास त्यांना पदावर राहाता येत नाही.त्यामुळेे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना नेते राधाकृष्ण वाघुले यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

विद्यमान सरपंच अर्चना यशवंत रणनवरे, उपसरपंच संतोष अशोक खंडागळे, सदस्य सविता पोपट बनकर, अशोक लालचंद कचे, सुनिल तुकाराम बोडखे, लता भाऊसाहेब पटारे, अर्चना शिवाजी पवार, कल्पना जयकर मगर, कालिंदा बाबासाहेब गायकवाड, दिपाली सचिन खंडागळे या दहा सदस्यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याने त्यांचे सदस्यपद रद्द करावे, अशी मागणी वाघुले यांनी तक्रार अर्जात केली आहे.

अर्जात पुढे म्हटले आहे की, दि. 18 जानेवारी 2021 रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणकीत वरील 10 जण विजयी झाले आहेत. त्यांनी सरकारी जागा गट नंबर 245/1, 32, 287/1, 286 व 249 येथील श्रीरामपूर नेवासा रोडलगतच्या सरकारी जागेत अतिक्रमण करुन पत्रा शेड, दुकान टपरी, कच्चे बांधकाम करुन व्यवसाय करीत आहेत. ही जागा ग्रामपंचायत मालकीची व सार्वजनिक वहिवाटीची असून गट नंबर 249 ची जागा दावल मलिक देवाची वक्फची आहे. सदरचे कृत्य हे बेकायदेशिर आहे.

विद्यमान सदस्य, सदस्य पति, सदस्याचा भाऊ, सदस्याचे वडील, सदस्याचे सासरे यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याच्या ग्रामपंचायत दप्तरी नोंदी आहेत. तर काहींनी बेकायदेशीर ग्रामपंचायतीचे ठराव करुन दुसर्‍याच्या नावावर ट्रांन्सफर केलेल्या आहेत. सरकारी जागेत आतिक्रमण केल्याची ग्रामपंचायत दप्तरी स्पष्ट नोंद असुनही ही माहिती लपवुन ठेवून ग्रामपंचायत निवडणूक लढवुन विजयी झाले आहेत. ते सदस्य पदावर रहाण्यास अपात्र असून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी वाघुले यांनी केली आहे. यामुळे टाकळीभानच्या ग्रामपंचायत वर्तुळात खळबळ उडाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com