५६ लाखांचा अपहार

युनियन बँकेच्या शाखा व्यवस्थापकासह तिघांविरुद्ध गुन्हा
५६ लाखांचा अपहार

संगमनेर | शहर प्रतिनिधी

बनावट कागदपत्र तयार करून कर्ज प्रकरणे मंजूर करून बँकेच्या पैशाचा स्वतःच्या फायद्या करिता अपहार करून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी शहरातील तत्कालीन युनियन बँकेच्या व्यवस्थापकासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी बँकेत एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचा अपहार होण्याची ही पहिलीच घटना आहे.

बँकेच्या तत्कालीन शाखाधिकारी नितीन कुमार यांनी दि. १/१/२०११ ते दि. ३१/२२/२०१३ बोगस कागदपत्रांच्या आधारे कर्ज प्रकरणे मंजूर करून ५६ लाखांचा अपहार केला. या कामासाठी त्यांना रुपेश आर. धारवड, विलास एल कुटे (रा. गणपती मळा, सुकेवाडी, ता. संगमनेर) दोघांनी सहकार्य केले. हा अपहार उघडकीस आल्यानंतर शाखा व्यवस्थापक समाधान पवार यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

या फिर्यादीवरून पोलिसांनी तत्कालीन शाखा व्यवस्थापक नितीन कुमार, रुपेश आर. धारवड, विलास एल. कुटे यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ५७१/२०२१ भारतीय दंड संहिता कमल ४०६, ४२०, ४६५, ४६८, ४७१, ४७२, १९९, २००, १९३, ३४ प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com