परळी पीपल्समधील अपहार; आरोपी घुगे, मानुरकरला कधी होणार अटक?

ठेवीदारांचा सवाल
परळी पीपल्समधील अपहार; आरोपी घुगे, मानुरकरला कधी होणार अटक?

अहमदनगर|Ahmedagar

परळी पिपल्स अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटीमधील (Parli People's Urban Multistate Co. Op. Credit Society) 11 कोटी 42 लाखांच्या अपहार प्रकरणी (froud case) नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने जनरल मॅनेजर विश्वजीत राजेसाहेब ठोंबरे व प्रमोद किसन खेडकर याला नुकतीच अटक केली. ते सध्या पोलीस कोठडीत (Police cell) आहे. परंतु, या अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला संस्थापक चेअरमन नितीन सुभाष घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी निखीलेश शिवकुमार मानुरकर यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

यांना कधी अटक केली जाणार व आमचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न ठेवीदारांकडून करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी यात लक्ष घालून मुख्य सूत्रधारांना गजाआड करावे, अशी मागणी होत आहे.

परळी पिपल्स अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटीच्या (Parli People's Urban Multistate Co. Op. Credit Society) जिल्ह्यात श्रीरामपुर (Shrirampur), नेवासा (Newasa) , तिसगाव, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी (Pathardi) तसेच औरंंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील औरंगाबाद, गंगापूर, चितेपिंपळगाव आणि बीड जिल्ह्यातील केज येथे शाखा होत्या. सदर शाखांमध्ये ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवलेल्या आहेत. त्यांच्या ठेवींची मुदतपुर्ती होवुन ही पैसे परत मिळाले नाहीत. श्रीरामपुर शाखेत (Shrirampu Branch) ठेवलेले ठेवींची रक्कम मिळाली नसल्याने ठेवीदार संजय दत्तात्रय शिंदे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात चेअरमन, संचालक, मॅनेजर आदींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा गुन्हा नगर येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत असून आतापर्यंत गुन्हे शाखेने मॅनेजर अमयकुमार गोडसे जनरल मॅनेजर विश्वजीत ठोंबरे व प्रमोद खेडकर यांना अटक केली आहे. यातील गोडसे याला जामीन मिळाला आहे. ठोंबरे व खेडकर हे पोलीस कोठडी आहे. ठेवीदारांच्या पैशावर डल्ला मारणारे खरे गुन्हेगार नितीन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी निखीलेश मानुरकर आहेत. त्यांना अटक केल्यानंतर या घोटाळ्याची व्याप्ती समोर येणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेने घुगे व मानुरकर यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी ठेवीदारांकडून होत आहे.

सॉफ्टवेअरचा उपयोग करून अपहार

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी चेअरमन नितीन घुगे व निखीलेश मानुरकर यांची पुण्यात सॉफ्टवेअरची कंपनी होती. त्यांना सॉफ्टवेअरचे ज्ञान असल्याने त्यांनी याचा उपयोग सर्वसामान्य लोकांना लुबडण्यासाठी केला. परळी अर्बनमध्ये गुंतवणूक करणार्‍या ठेवीदारांच्या पैशावर डल्ला मारण्यासाठी त्यांनी सेक्टो इलेमेंट या सॉफ्टवेअरचा वापर केला. त्याद्वारे ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला मारून 11 कोटी 42 लाखांचा अपहार केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com