Admission 2021 : आजपासून अकारावी प्रवेश प्रक्रिया

माध्यमिक शिक्षण विभाग : 26 तारखेला पहिली गुणवत्ता यादी
Admission 2021 : आजपासून अकारावी प्रवेश प्रक्रिया
file photo

अहमदनगर (प्रतिनिधी)-

अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) न्यायालयाने रद्द केलेली आहे. यामुळे राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या मान्यतेनूसार सोमवारपासून 11 वीची ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

यात 16 ते 23 ऑगस्ट दरम्यान संबंधीत ज्युनिअर कॉलेज अथवा उच्च माध्यमिक महाविद्यालयाना प्रवेश अर्ज भरून घेता येणार असून त्यानंतर 26 ताखेला अकरावी प्रवेशासाठी पहिली गुणवत्त यादी प्रसिध्द करण्यात येणार आहेत. दरम्यान, ज्या ठिकाणी ऑनलाईन अडचण असले त्या ठिकाणी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सांगण्यात आले आहे.

यंदा करोनामुळे दहावीची परीक्षा न होता मुल्यमापनावर आधारीत दहावीचा निकाल जाहीर झाला असून यामुळे निकालाची टक्केवारी 99.97 टक्के आहे. दहावीच्या निकालानंतर राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने 11 वी प्रवेशासाठी सीईटीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, न्यायालयाने सीईटीची परीक्षा न घेता 11 वी प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात काही ठिकाणी ही प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. दरम्यान, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांनी याबाबत 15 ऑगस्ट रोजी 11 वी प्रवेश प्रक्रियेबाबत आदेश काढले आहेत. यात ही प्रक्रिया जिल्ह्यात राबविण्यास सुचवले आहे. यात ज्युनिअर कॉलेज अथवा उच्च माध्यमिक महाविद्यालयानी उद्यापासून प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सांगण्यात आले आहे.

असे आहे वेळापत्रक

16 ते 23 ऑगस्ट दरम्यान विद्यार्थ्याकडून प्रवेशाचा अर्ज भरून घेणे, अथवा ज्युनिअर कॉलेजने जमा करणे.

24 आणि 25 ऑगस्ट प्राप्त अर्जाचे संगणिकरण करणे.

26 ऑगस्ट पहिला गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे.

27 ऑगस्ट पहिल्या गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदवणे.

28 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान प्रथम गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे.

2 सप्टेंबरला पहिल प्रतिक्षा यादी प्रसिध्द करणे.

2 ते 4 सप्टेंबर पहिल्या गुणवत्ता यादीनूसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे.

6 ते 9 सप्टेंबर दरम्यान दुसरी प्रतिक्षा यादी प्रसिध्द करणे.

11 सप्टेंबर तिसरी प्रतिक्षा यादी प्रसिध्द करणे.

11 ते 14 तिसर्‍या प्रतिक्षा यादीनूसार प्रवेश प्रक्रिया राबविणे.

ज्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबविणे शक्य नसल्यास त्या ठिकाणी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मात्र, त्या ठिकाणी करोना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सुचाना माध्यमिक शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

मनपसंत कॉलेजसाठी धावपळ

दहावीचा निकाल जवळपास शंभर टक्के लागेला आहे. यामुळे अकरावी प्रेवशासाठी विद्यार्थ्यासह पालकांची चांगलीच धावपळ होणार आहे. त्यात न्यायालयाने सीईटी परीक्षा रद्द केल्याने अकरावी प्रवेशासाठी मनपसंत कॉलेसाठी विद्यार्थ्यांची धावपळ होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com