अकरावीच्या सीईटीची वेबसाईट बंद

अकरावीच्या सीईटीची वेबसाईट बंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अकरावी प्रवेशासाठी (Eleventh Admission) घेण्यात येणार्‍या कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (CET) नोंदणीसाठी सुरू करण्यात आलेली वेबसाईट (Website) चालत नसल्याने विद्यार्थ्यांची (Student) डोकेदुखी वाढली आहे. बुधवारी दिवसभर ही वेबसाईट बंद (Website Close) असतानाच काल गुरूवारीसुध्दा ती चालत नसल्याने विद्यार्थी हैराण झाले आहेत.

दरम्यान, निकालाच्यावेळीही वेब साईट हँग (Web site hang) झाली होती. त्यामुळे निकाल पाहण्यासाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला होता. आता अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी करता येत नाही. तांत्रिक कारणाने ही बेबसाईट बंद असल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ दिला जाईल असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, या घोळामुळे प्रवेश लांबण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com