अकरावी प्रवेशासाठी बकळ जागा !

सीईटीनंतर होणार प्रवेश प्रक्रिया : जागा 77 अन् उत्तीर्ण 70 हजार 566
अकरावी प्रवेशासाठी बकळ जागा !
अकरावी प्रवेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने (State Board of Secondary and Higher Secondary Examinations) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर (Class X results announced recently) झाला. यात 99.97 टक्क्यांच्या सरासरीने 70 हजार 566 विद्यार्थी पास (Student Pass) झाले आहेत. आता विद्यार्थ्यांची 21 तारखेला सीईटी परीक्षा (CET Exam) होणार असून त्यानंतर प्रवेश प्रक्रिया (Admission process) होणार आहे. दरम्यान जिल्ह्यात अकरावीसाठी अनुदानीत, विना अनुदानीत आणि स्वयंसिध्द अकरावीच्या 940 तुकड्यांमध्ये 76 हजार 660 जागा आहेत. दहावीचे जवळपास शंभर टक्के पास होवूनही अकरावी प्रवेशाचे विद्यार्थी आणि पालकांना टेन्शन राहणार नाही.

16 जुलैला करोनामुळे ऑनलाईन (Covid 19 problem Online 10th exam result) पध्दतीने दहावीच्या परीक्षेचा निकाल झाला. यात जिल्ह्यातून (Ahmednagar District) दहावीसाठी एकूण 70 हजार 585 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील 70 हजार 566 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. अवघे 19 विद्यार्थी नापास झाल्याने नगर जिल्ह्याचा (Ahmednagar District) निकाल 99.97 टक्के लागला आहे. यंदाच्या दहावीच्या परीक्षा म्हणजे ना वर्ग भरले ना परीक्षा झाली. तरी मागील वर्षीच्या मुल्यमापनावर सर्वच्या सर्व विद्यार्थी पास होवून अकरावीत गेलेले आहे.

मात्र, पुढील शिक्षणासाठी नामंकित ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेशासाठी या विद्यार्थ्यांना 21 तारखेला सीईटी परीक्षेला समोरे जावे लागणार असून या परीक्षेच्या गुणवत्तेवर त्यांना प्रवेश मिळणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात कला, विज्ञान, वाणिज्य व संयुक्त अशा शाखांच्या तब्बल 76 हजार 760 जागा उपलब्ध आहेत. जिल्ह्यात 440 कनिष्ठ महाविद्यालये असून त्यात 453 अनुदानित, 295 विनाअनुदानित, 192 स्वयं अर्थसहित अशा एकूण 940 तुकड्या आहेत. या सर्व तुकड्यांची क्षमता यंदा 76 हजार 550 विद्यार्थ्यांची आहे. यामुळे सीईटी परीक्षा असली दहावीतील जवळपास सर्व विद्यार्थी पास झालेले असले, तरी अकरावी प्रवेशाचे टेन्शन राहणार नाही.

दहावीत यंदा 70 हजार 566 विद्यार्थी उत्तीर्ण असून त्यातील 50 टक्के म्हणजे 35 हजार विद्यार्थ्यांनी जरी विज्ञान शाखा निवडली तरी प्रवेश होणार आहेत. परंतु विज्ञान शाखेकडे कल असल्याने कला शाखेतील अनेक जागा रिक्त राहतात. त्यामुळे कला शाखांना प्रवेशासाठी कसरत करावी लागते. जिल्ह्यात शाखानिहाय आणि मंजूर तुकड्यानिहाय 76 हजार 660 जागा आहेत. यात 34 हजार (44.35 टक्के) जागा विज्ञान शाखेसाठी उपलब्ध आहेत. तर कला शाखेसाठी 29 हजार 600 जागा असून 10 हजार 970 जागा वाणिज्य शाखेसाठी, तर 2 हजार 120 जागा संयुक्त शाखेसाठी आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com