विजेच्या धक्क्याने तरुणीचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने तरुणीचा मृत्यू

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या हद्दीत येणार्‍या चितळी परिसरात राहणार्‍या तरुणीस विजेचा धक्का बसून तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राहाता तालुक्यातील चितळी येथील अर्चना गणेश वाघ (वय 24) हिला विजेचा धक्का लागल्याने तिला उपचारासाठी श्रीरामपुरात साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराआधीच ती मयत असल्याचे साखर कामगार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. साखर कामगार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या अहवालावरून तालुका पोलिसांत आकस्मात मृत्यू रजिस्टर नं. 29 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बोरसे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com