अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

खडकी येथील वीज कंपनीच्या कंत्राटी कामगाराचा बाबुर्डी बेंद येथे काम करत असताना विजेचा धक्का लागून मुत्यू झाला. रुपेश सुकदेव बहिरट असे मयत कर्मचार्याचे नाव आहे.

या कंत्राटी कामगाराच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत मिळावी, कर्मचार्यांच्या सुरक्षिततेबाबत हलगर्जीपणा करणार्या वरिष्ठ अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करत नातेवाईक व ग्रामस्थांनी मृतदेह थेट नगरमध्ये वीज कार्यालयासमोर ठेऊन ठिय्या आंदोलन केले.

वीज वितरणचे अधीक्षक अभियंता यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले. यावेळी माजी सभापती बाळासाहेब हराळ, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, माजी सभापती रामदास भोर, बाजार समिती सभापती अभिलाष घिगे, रेवणनाथ चोभे, दिलीप भालसिंग, शरद बोठे, प्रमोद कोठुळे, अरुण कापसे आदी उपस्थित होते. तणावाचे वातावरण असल्याने यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

वीज वितरणचे अधीक्षक अभियंता यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेत रूपेश याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.