विजेच्या अनियमितपणामुळे पुणतांबा परिसरातील ग्रामस्थ त्रस्त

विजेच्या अनियमितपणामुळे पुणतांबा परिसरातील ग्रामस्थ त्रस्त

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा परिसरातील पुणतांबा, रास्तापूर, रामपूरवाडी, चांगदेवनगर परिसरात विजेचा पुरवठा सातत्याने विस्कळीत होत असल्यामुळे परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थी वर्ग त्रस्त झाले आहे. परिसराला येथील वाकडी रोडलगत असलेल्या महावितरण कंपनीच्या उपकेंद्रामार्फत विद्युत पुरवठा केला जातो व या उपकेंद्राला कोपरगाव-निघोज या विद्युत वाहिनीमार्फत वीज पुरवठा केला जातो.

मात्र ही विद्युत वाहिनी मध्ये जुनी असल्यामुळे अनेक वेळा तांत्रिक बिघाड सातत्याने होत असतो व त्याचा परिणाम पुणतांबा परिसराच्या विद्युत पुरवठ्यावर होत असतो. पुणतांबा परिसरातील विद्युत लाईन सुद्धा जुन्या झाल्यामुळे सातत्याने बिघाड होतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. येथील उपकेंद्रामार्फत विद्युत पुरवठा सुरळीत करणे आवश्यक असते.

मात्र अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे त्यामध्ये सातत्याने अडचणी येत आहे. परिसरात वीज बिलाच्या वसुलीचे प्रमाण कमी आहे तसेच वीज चोरीचे प्रमाण वाढले आहे. वीज चोरीमुळे विद्युत पुरवठा कमी जास्त दाबाने होतो. वीज चोरी विरुद्ध महावितरणच्या अधिकार्‍यांनी धडक कारवाई करण्याची गरज आहे. तसेच बर्‍याच लाईनवर झाडाच्या फांद्या मधी येत असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत घेण्याचे प्रमाण वाढले आहे. महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने परिसरातील विद्युत पुरवठा अखंडित सुरु ठेवावा, अशी मागणी वीज ग्राहकाकडून केली जात आहे.

Related Stories

No stories found.