श्रीरामपूर वीज ग्राहक संघटनेच्यावतीने वीज दरवाढीच्या प्रस्तावाची होळी

माजी आमदार मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांत कार्यालयासमोर आंदोलन
श्रीरामपूर वीज ग्राहक संघटनेच्यावतीने वीज दरवाढीच्या प्रस्तावाची होळी
RDB

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

वीज वितरणने वीज आयोगाकडे घरगुती, शेती, व्यापारी व औद्योगिक अशा सर्व प्रकारच्या वीज दरात सरासरी 37 टक्के इतकी अव्वाच्या सव्वा दरवाढ प्रस्तावित केली आहे. सदर दरवाढीने वीज ग्राहकाचे कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे सदरची प्रस्तावीत दरवाढ मागे घ्यावी, यासाठी श्रीरामपूर वीज ग्राहक संघटनेच्यावतीने माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली प्रांत कार्यालयासमोर वीज दरवाढीच्या प्रस्तावाची होळी करण्यात आली. तसेच विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले.

याप्रसंगी वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष डॉ. गोरख बारहाते तसेच निमंत्रक लव शिंदे यांनी या प्रस्तावित वीजदर वाढीच्या प्रस्तावबाबात सविस्तर विवेचन केले. नियमानुसार 10 टक्केपेक्षा अधिक दरवाढ प्रस्तावित करूनये, असे निर्देश विद्युत अपिलिय प्राधिकरण (नवी दिल्ली) यांनी दिलेले आहेत. असे असताना 37 टक्के इतकी दरवाढ प्रस्तावित केली आहे. केवळ महावितरणची 67 कोटी रकमेची तूट भरून काढण्यासाठी हा खटाटोप असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच सदर दरवाढीला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली.

यावेळी युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, हिम्मतराव धुमाळ, पुंजाहरी शिंदे, ज्ञानदेव साळुंके, भाऊसाहेब उंडे, नाना पाटील, राहुल मुथा, बाळासाहेब पटारे, अ‍ॅड. उमेश लटमाळे, रोहन डावखर, यशवंत रणनवरे, आदिनाथ झुराळे, दत्तात्रय नाईक, विरेश गलांडे, रामभाऊ कसार, यशवंत बनकर, ज्ञानेश्वर शिंदे, योगेश विटनोर, प्रफुल्ल दांगट, अ‍ॅड. डी. आर. पटारे, रमेश सोनवणे, शरीफ मेमन, महेश पटारे, पंढरीनाथ मते, अमोल कोलते, सोपान नाईक, कृष्णराव बडाख, उत्तम डांगे, युवराज थोरात, भास्कर खंडागळे, प्रमोद करंडे, अशोक शिंदे, सागर यादव, बबन मोरगे, कैलास भागवत, आबासाहेब लबडे, बबन उंडे, नवनाथ रोटे, सुभाष शिंदे, दादासाहेब खर्डे, उद्धव आहेर, नारायण बडाख, शिवाजी शिंदे, सुनील बोडखे, भाऊसाहेब चोरमल, विशाल धनवटे, विलास कदम, सुधीर भारस्कर, बाळासाहेब गोराणे, नंदकुमार तर्‍हाळ, जगन्नाथ नरसाळे, पुंडलीक पटारे, बाबाजी गोरे, दिगंबर नांदे, भगिरथ पवार, दत्तात्रय पाटील, वामनराव तुवर, संदीप डावखर, मनोज शेळके, वैभव सुरडकर, निलेश कुंदे, बाळासाहेब शिंदे, प्रभाकर तुवर, राधु पटारे, सुरेश अमोलीक, संजय डुक्रे, बाळासाहेब विधाटे, अतुल तांबे, विक्रांत भागवत, संजय मोरगे, पंकज देवकर आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com