महावितरणच्या सहायक अभियंत्यांना धक्काबुक्की

महावितरणच्या सहायक अभियंत्यांना धक्काबुक्की

10 ते 15 जणांविरोधात गुन्हा, एकास अटक

अहमदनगर (प्रतिनिधी) / ahmednagar - शहराच्या गंजबाजार येथील महावितरण कार्यालयातील सहायक अभियंता स्वप्नील संजयराव उल्हे (वय 32 रा. वसंत टेकडी, मुळ रा. चांदुरबाजार जि. अमरावती) यांना वीज बिल भरण्याच्या कारणातून 10 ते 15 लोकांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. बुधवारी सायंकाळी सव्वा सहा ते साडेसहा वाजेच्या दरम्यान कार्यालयामध्ये ही घटना घडली.

या प्रकरणी अभियंता उल्हे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सुल्तान दुल्हेखान शेख (रा. जुनाबाजार, नगर) याच्यासह 10 ते 15 अनोळखी व्यक्तीविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलिसांनी शेख याला बुधवारी रात्रीच अटक केली. त्याला गुरूवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. महावितरण विभागाच्या गंजबाजार कार्यालयाअंतर्गत येणार्‍या जुना बाजार परिसरातील सुल्तान शेख याचे वीज बिल थकले होते. बुधवारी महावितरणचे अधिकारी बिल वसुली करण्यासाठी शेख याच्या घरी गेले होते.

त्याने बिल भरले नाही. उलट सायंकाळी 10 ते 15 इसमांना घेऊन तो कार्यालयात आला. यावेळी तेथे असलेले सहायक अभियंता उल्हे यांच्याशी हुज्जेत घातली. हा जमाव उल्हे यांच्या अंगावर धावून गेला, त्यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. कार्यालयात गोंधळ घातला. याबाबत उल्हे यांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, कोतवालीचे निरीक्षक राकेश मानगावकर, उपनिरीक्षक सतीश शिरसाठ यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांच्या पथकाने शेख याला रात्रीच ताब्यात घेतले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com