अहमदनगर (प्रतिनिधी) -

वसुलीसाठी कनेक्शन कटची मोहीम तर दुसरीकडे कोरोना महामारीचा धोका... अशा दुहेरी संकटात सापडलेल्या एमएसईबी

ग्राहकांनी थकबाकी ऑनलाईन भरण्याला पसंती दिली. जिल्ह्यातील 2 लाख कस्टमरांनी 38 कोटी रुपये ऑनलाईन पेमेंट एमएसईबीला पेड केले.

लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांना घर बसल्या वीजबिलांचा भरणा करण्याची ‘ऑनलाईन’ सोय एमएसईबीने करून दिली आहे. महावितरणची वेबसाईट व मोबाईल अॅप तसेच अन्य पर्यायांद्वारे ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा क्रेडीट कार्ड वगळता निःशुल्क करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात वीजबील भरणा केंद्राच्या लाईनमध्ये उभे राहणे किंवा गर्दी टाळून घरबसल्या कोणत्याही वेळेत ‘ऑनलाईन’ वीजबिल भरण्याची सोय वीजग्राहकांना उपलब्ध आहे. या सुविधेमुळे वीजबिल भरणा केंद्रात जाऊन रांगेत उभे राहण्याऐवजी ‘ऑनलाईन’ वीजबिल भरण्यास ग्राहकांची पसंती वाढली आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने वीज ग्राहकांनी आरोग्यविषयक काळजी घेत रांगेत किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊन इतर व्यक्तींच्या संपर्कात येण्याऐवजी एका क्लिकवर उपलब्ध असलेल्या ‘ऑनलाईन’ सोयीद्वारे घरबसल्या वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

मोठ्या बिलावर बँक अकौंटचा तपशील
‘ऑनलाईन’द्वारे वीजबिल भरणा केल्यानंतर लगेचच ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’ द्वारे पोहच देण्यात येते. याशिवाय महावितरणच्या वेबसाईटवर व मोबाईल अॅपवर मागील वर्षभराच्या महिन्यांतील बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती उपलब्ध आहे. 10 हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणार्यांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा ग्राहकांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे.

25 टक्के सूट

लघुदाब वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे वीजबिल भरणा केल्यास वीज देयकामध्ये 0.25टक्के सूट देण्यात येत आहे. या आधी नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा करण्यासाठी 500 रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडीटकार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीटकार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ द्वारे होणारा वीजबिल भरणा आता निःशुल्क करण्यात आला आहे.

ऑनलाईन ट्रन्जॅक्शन

विभाग ग्राहक बिल पेड
अ.नगर ग्रामीण 23465 3 कोटी 79 लाख
अ.नगर शहर 70370 16 कोटी 83 लाख
कर्जत 16317 2 कोटी 77 लाख
संगमनेर 57804 9 कोटी 44 लाख
श्रीरामपूर 31578 5 कोटी 79 लाख
एकूण 2 लाख 38 कोटी 63 लाख