पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) -

भाजप सरकारच्या काळात सुरू केलेल्या अनेक लोक कल्याणकारी योजना बंद करण्याचा सपाटा आघाडी सरकारने

लावला आहे. शेतकर्यांच्या हिताची असणारी सिंगल फेज योजना देखील या सरकारने बंद केल्याने हे सरकार शेतकर्यांच्या जीवावर उठले आहे काय अशी टीका आमदार मोनिकाताई राजळे यांनी केली.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून वीज बिलाचे कारण सांगून शेती व घरगुती वीज पुरवठा खंडित करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ आ. राजळे यांनी कार्यकर्त्यांसमवेत विद्युत विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन केले. आंदोलनात भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, पं.स. सभापती गोकुळ दौंड, जि.प. सदस्य राहुल राजळे, माजी जि.प. सदस्य सोमनाथ खेडकर, भगवान साठे, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा काशीबाई गोल्हार, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, पं.स. सदस्य विष्णूपंत अकोलकर, सुभाष केकाण, सुनील ओव्हळ, एकनाथ आटकर, चारूदत्त वाघ, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर, नगरसेवक प्रवीण राजगुरू, रमेश गोरे, मंगलताई कोकाटे, बजरंग घोडके, अनिल बोरुडे, महेश बोरुडे, नामदेव लबडे, बबन बुचकुल, संपत गर्जे, डॉ. सुहास उरणकर, वसंत पवार, बाळासाहेब आकोलकर, माजी नगरसेवक बंडू बोरुडे, प्रमोद भांडकर, पांडुरंग सोनटक्के, किशोर परदेशी, बाबासाहेब किलबिले, अभिजीत गुजर, अजय रक्ताटे, प्रसिध्दी प्रमुख नारायण पालवे, युसूफ शेख, बंडू पठाडे, जमीर आतार आदींसह भाजपाचे कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.

यावेळी आ. राजळे म्हणाल्या, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री यांच्यामध्येच एकमत नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ वेगवेगळी वक्तव्य यांच्याकडून करण्यात येत आहेत. विद्युत विभागाचा पूर्णपणे अनागोंदी कारभार चालू आहे. खराब झालेले विद्युत रोहित्र दोन ते तीन महिने दुरुस्त होत नाहीत. वायरमन काम करत नाहीत. शेतकरी पैसे भरायला तयार असताना देखील त्यांना वीज जोड मिळत नाही. शेतकरी वीज बिलाचे टप्प्याटप्प्याने पैसे भरायला तयार आहेत. जुने केबल जळून शेतकर्यांचा वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे हातातोंडाशी आलेली गहू, हरभरा यासारखी पिके जळून जाण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने शेतकर्यांच्या संतापाचा उद्रेक होऊ शकतो.सरकारने वेळीच नोंद घ्यावी, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.