तुटलेल्या तारांचा शॉक बसून सहा म्हशी ठार

तुटलेल्या तारांचा शॉक बसून सहा म्हशी ठार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरांमध्येही तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसून शेतकर्‍यांचे लाखोचे नुकसान झाले आहे. कानडेमळा येथील शेतकरी सदाशिव निस्ताने यांच्या 30 म्हशी कानडे मळा जवळील भिगांर नाल्यामध्ये पाणी पिण्यासाठी गेल्या असता चक्रीवादळामुळे विजेच्या तार तुटून विजेचा झटका या म्हशींना बसला व त्या जागीत ठार झाला.

या घटनेत निस्ताने शेतकर्‍याचे सुमारे 9 ते 10 लाख रुपयेचे नुकसान झाले. यावेळी आ. संग्राम जगताप यांनी तहसीलदार तसेच महावितरणच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून पंचनामा करण्याच्या सूचना दिल्यानंतर तातडीने पंचनामा करण्यात आला. सुदैवाने याठिकाणी कुठलीही जीवित हानी झाली नाही.

दरम्यान, चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये निस्ताने या शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाकडून त्यांना तातडीने भरपाई मिळावी, अशी मागणी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com