विजेची तार गोठ्यावर पडल्याने एक गाय व म्हशीचा मृत्यू

विजेची तार गोठ्यावर पडल्याने एक गाय व म्हशीचा मृत्यू

करजगांव |वार्ताहार| Karajgav

नेवासा (Newasa) तालुक्यातील निंभारी (Nimbhari) येथे विद्युत प्रवाह सुरू असलेली मेन लाईनची तारा (Electricity Cabale) जनावरांच्या गोठ्यावर पडल्यामुळे एक गाय (Cow) व एक म्हशीचा मृत्यू (Buffalo Death) झाला.

निंभारी येथील साहेबराव बाजीराव पालवे यांच्या गट नं 125 मधील घराजवळ जनावराचे शेड आहे. विद्युत प्रवाह (Electricity Cabale) सुरू असलेली तार तुटल्यामुळे एक गाय व एका गाभन म्हशीला विजेचा धक्का बसल्यामुळे मृत्यू (Death) झाला. सदरची घटना दुपारी दोनच्या दरम्यान घडली.

विजेची तार गोठ्यावर पडल्याने एक गाय व म्हशीचा मृत्यू
शेतकऱ्यांची खरीपाच्या संकटानंतर अवकाळीमुळे रब्बीची पिकेही संकटात

घटनेची माहिती मिळताच, विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. यानंतर महावितरणाच्या (MSEDCL) कर्मचार्‍यांनी विद्युत तारा बाजुला केल्या. सदर शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाल्याने भरपाई देण्याची मागणी केली आहे.

तलाठी बी.डी. कराळे, पशुवैद्यकीय अधिकारी शिंदे, यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी महावितरणाचे कर्मचारी नितीन जाधव, संजय आयनर, रामभाऊ गाडेकर, सुभाष पवार, संदीप जाधव, आत्माराम जाधव आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.

विजेची तार गोठ्यावर पडल्याने एक गाय व म्हशीचा मृत्यू
अजित पवार ठरवणार आज जिल्हा बँकेचा नवा अध्यक्ष

महावितरण कर्मचारी व अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

परिसरामध्ये अनेक विद्युत तारा व खांब जुने झालेले आहे. तसेच नविन झालेली कामे ही नित्कृष्ठ दर्जाची झालेली असल्यामुळे तारा तुटण्याचे प्रमाण वारंवार होत आहे. या गोष्टीकडे महावितरण कर्मचारी व अधिकार्‍यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप यावेळी नागरीकांनी केला.

विजेची तार गोठ्यावर पडल्याने एक गाय व म्हशीचा मृत्यू
मढी येथे मानाची होळी पेटताच दोन गटात हाणामार्‍या
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com