विजेच्या धक्क्याने नेवाशातील तरुणाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने नेवाशातील तरुणाचा मृत्यू

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा बुद्रुक येथिल सौरव नामदेव पठाडे (वय -22) या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असून नेवासा परिसरात गेले तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. सर्व जनजीवन विस्कळीत झालेले आहे.

अति पावसाने नागरिक हैराण असताना आज ही धक्कादायक घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नेवासा बुद्रुक येथील सौरव पठाडे हा तरुण आपल्या जनावरांसाठी कुट्टी करत असताना जोरदार पाऊस सुरू होता. दरम्यान त्याला विजेचा धक्का बसल्याने तो मयत झाला.

वस्तीच्या जवळच्या नागरिकांनी त्याला दवाखान्यात हलवले, परंतु त्याला मृत घोषित करण्यात आले. मयत सौरव पठाडे याच्या मागे अपंग आई व अंध वडील, एक बहीण आहे. तो एकुलता एक असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे हे तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com