
सोनई |वार्ताहर| Sonai
नेवासा तालुक्यातील सोनई गावाच्या दृष्टीने काल बुधवार घातवार ठरला. वेगवगळ्या घटनांमध्ये पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यात विजेच्या तारेचा शॉक लागून तीन मृत्यू झालेले आहेत. एका युवतीने आत्महत्या केली. एका महिलेने विष प्राशन केल्याने उपचारापूर्वीचा तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या विविध घटनांनी सोनई परिसर हादरून गेला आहे.
सोनईतील बालाजी नगर परिसरात निर्मला रमेश कुसळकर (वय 42), निकिता अमोल ननवरे (वय 22), धुणे वाळू घालत असताना विजेच्या तारेचा शॉक लागून या आई व मुलगी एकमेकींना वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्यू पावल्या आहेत. दुसरी घटना शिंगणापूर रोडवर स्टेट बँके जवळ टेलिफोन वायरचे काम करत असताना बाळासाहेब त्रिंबक खोसे (वय 42) हे शॉक लागून मृत्यू झाला. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याघटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.