विजवाहक तारेचा धक्का लागून शेतमजुरासह म्हैशीचा मृत्यू

एरंडगाव येथील घटना || एकजण गंभीर जखमी
विजवाहक तारेचा धक्का लागून शेतमजुरासह म्हैशीचा मृत्यू

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

तालुक्यातील एरंडगाव येथे तुटलेल्या विद्युत वाहक तारेचा धक्का लागून एक शेतमजूर व म्हैस जागेवर ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी ( दि.14 ) सकाळी घडली.

विजवाहक तारेचा धक्का लागून शेतमजुरासह म्हैशीचा मृत्यू
सोनईत घातवार : विजेच्या धक्क्याने मायलेकीसह तिघांचा मृत्यू

या घटनेत महादेव लक्ष्मण पूंड (50, रा. एरंडगाव) हे ठार झाले. तर भाऊसाहेब रतन बनकर (42, रा. एरंडगाव) हे जखमी झ झाले आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितनुसार, पूंड हे सकाळी साडेसातला  ऊसाच्या शेतात पाणी भरत होते. यावेळी गोठयातील म्हैस सुटून ऊसाच्या शेतात घुसली. म्हैस तेथे तूटलेल्या विद्युत वाहक तारेत अडकून कोसळली. म्हैस  कां पडली म्हणून पहाण्यासाठी पुंड धावतच म्हशी जवळ गेले.

विजवाहक तारेचा धक्का लागून शेतमजुरासह म्हैशीचा मृत्यू
दोन मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक

तेव्हां त्यांनाही तारेचा धक्का लागून तेही कोसळले. यावेळी काही अंतरावर असलेल्या भाऊसाहेब रतन बनकर यांनाही शॉक बसून ते लांब फेकले गेले. पुंड व बनकर यांना तातडीने शेवगाव येथील नित्यसेवा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र पुंड याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर बनकर यांच्यावर उपचार सुरू आहेत.

विजवाहक तारेचा धक्का लागून शेतमजुरासह म्हैशीचा मृत्यू
समृध्दी महामार्गावर बर्निंग कारचा थरार

शवविच्छेदनानंतर सायंकाळी उशिरा पुंड यांच्यावर एरंडगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शेवगाव पोलीस ठाण्यात या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार बाबासाहेब शेळके तपास करीत आहेत.

विजवाहक तारेचा धक्का लागून शेतमजुरासह म्हैशीचा मृत्यू
नागापूर परिसरात युवकाचा मृतदेह आढळला

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com