साकुरीत विजेचा शॉक बसल्याने एक जणाचा मृत्यू

साकुरीत विजेचा शॉक बसल्याने एक जणाचा मृत्यू

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यातील साकुरी येथे एकास विजेचा धक्का बसून तो मयत झाला आहे. दीपक एकनाथ बनसोडे (वय 33) रा. साकुरी असे मयताचे नाव आहे. ही घटना काल दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास बनसोडे यांच्या घरी घडली. शॉक बसल्यानंतर त्यांना शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटल येथे उपचारासाठी हलविण्यात आले.

मयत झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने राहाता पोलिसांनी अकस्मात मृत्यू 60/2022 सीआरपीसी 174 प्रमाणे नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आवारे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com