विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

विजेच्या धक्क्याने (Electric Shock) युवकाचा जागीच मृत्यू (Youth Death) झाल्याची दुर्घटना कर्जत (Karjat) तालुक्यातील बहिरोबावाडी येथे घडली आहे. बहिरोबावाडी - चिंचोली फाटा दरम्यान वस्तीनजीकच्या शेतात बुधवारी (दि.15) पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. चेतन सुरेश शिंगाडे (20) असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू
टाकळीमानुरला दहावी परिक्षा केंद्रे ताब्यात घेण्याचा प्रयत्न

शेतात काम करत शेतात लोंबकळत असलेल्या विजेच्या तारांमुळे (Electric Wires) ही दुर्घटना झाली. मेहराज पठाण यांच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते सुनील यादव यांच्यासह कुटुंबीय व ग्रामस्थांनी महावितरणला (MSEDCL) जबाबदार धरत मृतदेह (Dead Body) ताब्यात घेण्यास नका दिला.

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू
राहाता बाजार समितीत सोयाबीनला मिळतोय 'हा' भाव

महावितरणचे अभियंता दत्तात्रय सांगळे यांनी 20 हजार रुपयांचा धनादेश मदत म्हणून दिला व पुढील मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू
नगरमध्ये इन्फ्लूएंझाचा पहिला बळी
विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू
नूतन अध्यक्ष कर्डिलेंकडून 700 पदभरतीची घोषणा
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com