शॉक लागून युवक ठार तर वडिल जखमी

शॉक लागून युवक ठार तर वडिल जखमी

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

तालुक्यातील बाळगव्हाण येथील पोल्ट्री व्यावसायीक युवकाचा विजेचा मुख्य वाहिनीला धक्का लागल्याने शॉक बसून दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्याचे वडील गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.1) दुपारी घडली. शुभम गोकुळ दाताळ (24) असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तर त्याचे वडिल गोकुळ दाताळ हे या घटनेत जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शुभम हा वडिल गोकुळ दाताळ यांच्यासह त्यांच्या पोल्ट्री फार्मचा विजेचा सप्लाय बंद असल्याने डीपी जवळील लाईनला डिओ टाकत होता. यावेळी अचानकपणे त्याच्या हातातील लोखंडी पाईप मेनलाईनला लागल्याने त्याला जबर धक्का बसला त्याचा जागीच मृत्यू झाला.

त्याच्याजवळ उभे असणारे व त्यास वाचवण्याचा प्रयत्न करणार्‍या त्याच्या वडिलांना धक्का बसून ते बाजूला फेकल्याने ते जखमी झाले. मयत तरुण शुभम दाताळ हे इलेक्ट्रिक इंजिनिअर पदवी घेऊन नोकरी न करता स्वतःचा पोल्ट्री व्यवसाय करत होते. त्याच्या मागे आई-वडील, आजी, एक भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी पोलिसांत आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com