विजेचा धक्का लागून शेतकरी पती-पत्नीचा मृत्यू

शेवगाव येथे कटरने गवत कापताना घटना
विजेचा धक्का लागून शेतकरी पती-पत्नीचा मृत्यू

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

शेतात काम करीत असतांना वीज प्रवाह गवत कापण्याच्या कटर मशिनमध्ये उतरल्याने शेवगाव येथील पती पत्नीचा वीजेचा धक्का लागून जागेवर मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.23) दुपारी 12.30 च्या सुमारास घडली.

जालींदर एकनाथ कांबळे (37) व निता जालींदर कांबळे (26, राहणार शेवगाव, कांबळे वस्ती) अशी मृत्यु झालेल्या पती पत्नींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे पती-पत्नी नव्यानेच गवत काढण्यासाठी आणलेल्या कटर मशिनने कपाशी पिकातील गवत काढत होते. बांधावरुन टाकलेल्या केबल कटर मशिनच्या पात्याला गुंतून कापली गेली. यातील विजेचा प्रवाह कटरमध्ये उतरून जालींदर कांबळे यांना विजेचा धक्का लागला.

यामुळेे ते जागेवर पडले. पती पडले म्हणून नीता कांबळे त्यांना पाहण्यासाठी गेल्या पतीला हात लावला असता त्यांना ही विजेचा धक्का बसल्याने दोघांचाही जागेवर मृत्यू झाला. ही घटना त्यांची चार वर्षाची मुलीने पाहिल्याने हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आला. नातेवाईक व शेजारच्यांनी त्यांना त्वरीत उपचारासाठी ग्रामिण रुग्णालयामध्ये आणले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केली. पोलिसांनी पंचनाम करुन अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यांच्या मागे आई-वडील, चार वर्षाची मुलगी, दोन वर्षाचा मुलगा व भाऊ असा परीवार आहे. तरुण शेतकरी पती-पत्नी असा दुर्देवी मृत्यू झाल्याने परीसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com