म्हैस चारण्यासाठी गेलेल्या मुलाचा विजेचा शॉक लागून मृत्यू

म्हैस चारण्यासाठी गेलेल्या मुलाचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

शेतामधे म्हैस चारण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा विजेचा शाँक लागुन मृत्यु झाल्याची घटना तालुक्यताील मुंगुसवाडे येथे बुधवारी दुपारी घडली. राम नारायण हिंगे (वय 13) असे या घटनेत मृत्यु झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी मुंगुसवाडे येथील राम हिंगे हा शाळेत न जाता तो म्हैस चारण्यासाठी शेतामधे गेला होता. तेथे विजपंपासाठी विजपुरवठा घेतलेल्या केबलला त्याचा हा लागून विजेचा शाँक बसला.

यामध्ये राम जखमी झाला. त्याला उपचारासाठी खरवंडी येथील रूग्णालयात हलवण्यात आले परंतु. तत्पुर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी मृत घोषीत केले. एक वर्षापुर्वीच राम याची आई व बहीण दोघीही विहरीत पडुन मरण पावल्या होत्या. आणि आता त्याच ठिकाणी कुटूंबामधील एकुलता एक मुलाचाही विजेला चिकटुन मुत्यु झाल्याने मुंगुस्वाडे व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वडिलांचा आक्रोश

राम याचे वडिल नारायण हिंगे यांनी मुलाला मांडीवर घेऊन फोडलेल्या हंबरड्याने सर्वांचे डोळे पाणावले. माझी पत्नी व एक मुलगी विहरीत पडुन मयत झाल्या होत्या. मुलगा,एक मुलगी व मी ते दुःख पचवुन जगत होतो. मात्र नियतीच्या मनात आणखी क्रुर होते. आता माझ्या जगण्यातही राम नाही असा आक्रोश ते करत होते. यामुळे सर्वांची मने हेलावून गेली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com