विजेचा शॉक लागुन शाळकरी मुलाचा मृत्यू

विजेचा शॉक लागुन शाळकरी मुलाचा मृत्यू

बेलापूर |वार्ताहर| Belapur

विजेचा शॉक (Electric Shock) लागुन शाळकरी मुलाचा मृत्यू (Child Death) झाल्याची घटना बेलापूर (Belapur) पोलीस औट पोस्टच्या समोर घडली. विशाल भागीनाथ पिटेकर (वय 15) असे या मुलाचे नाव आहे.

याबाबत समजलेली माहीती अशी की, विशाल भागीनाथ पिटेकर हा गावातील जे. टी. एस. हायस्कूल येथे नववी इयत्तेत शिकत होता. त्याला अचानक विजेचा शॉक (Electric Shock) लागल्याने तो लांब फेकला गेला. घरातील नातेवाईकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी विजेची बटने बंद केली. नातेवाईकांनी त्याला तातडीने दवाखान्यात हलविले परंतू वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यास मृत (Death) घोषित केले.

बेलापूर (Belapur) येथील अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बेलापूर पोलीस औट पोस्ट समोरील संदीप ढोल पार्टीचे मालक नवनाथ धनवटे यांचा तो नातू होता. आई वडीलांची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे नवनाथ धनवटे यांच्याकडे तो शिक्षण घेत होता. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com