‘नगर अर्बन’साठी 94 उमेदवारी अर्ज

सत्ताधार्‍यांची सुरतची जागा होणार बिनविरोध 3 तारखेला छाणनी || 8 तारखेला उमेदवारांची अंतिम यादी
‘नगर अर्बन’साठी 94 उमेदवारी अर्ज
नगर अर्बन बँक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीत (Elections of Nagar Urban Bank) नगरमध्ये भाजप विरोधात भाजपमधील (BJP) लढतीत कॉँग्रेसनेही (Congress) उडी घेतली आहे. त्यामुळे भाजप-कॉँग्रेसची (BJP-Congress) युती झाल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान बँकेच्या 18 संचालकांच्या जागेसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काल 94 अर्ज दाखल झालेले आहेत. 3 नाव्हेंबरला दाखल अर्जाची छानणी (Scrutiny of Application) होवून 8 तारखेला वैध उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द होणार आहे. दुसरीकडे सत्ताधारी गटाचे गुजराथ राज्यातील सुरत येथील दिनेश कटारिया यांच्या विरोधात बँक वाचवा कृती समितीला उमेदवार न देता आल्याने सत्ताधारी गटाची ही जागा बिनविरोध होणार आहे.

बँकेच्या निवडणुकीत (Bank Election) बॅँक बचाव समितीच्या पॅनलचे प्रमुख भाजपचे माजी शहरजिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर (Advt. Abhay Agarkar) हे करत असून त्यांच्यात कॉँग्रेसचे दीप चव्हाण (Congress Deep Chavan) हेही सामील झाले आहेत. दुसर्‍या बाजुला स्व. दिलीप गांधी प्रणित सहकार पॅनलचे नेतृत्व भाजपचे विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे (Bhaiyya Gandhe), सुवेंद्र गांधी (Suvendra Gandhi) करत आहेत. मलीन प्रतिमा पुन्हा उजळविण्यासाठी सहकार पॅनल निवडणुक आखाड्यात उतरल्याचे सुवेंद्र गांधी यांनी सांगितले. गांधी यांच्या जोडीला गंधे आल्याने निवडणुकीत रंगत भरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तर बॅँकेची निवडणूक पक्षविरहीत असल्याने पॅनलचे नेतृत्व करत असल्याची माहिती कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दीप चव्हाण यांनी दिली.

भैय्या गंधेंची भूमिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांनी प्ररित होत भाजप स्वच्छ कारभार करत आहे. त्याच धर्तीवर अर्बन बँकेच्या निवडणुकीत उतोरलो आहे. नगर अर्बन बँक हि जिल्ह्यातील प्रमुख मोठी बँक आहे. अर्बन बँकेची मलीन झालेली प्रतिमा पुन्हा उजळविण्यासाठी व बँकेला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी मी सहकार पॅनल मधून निवडणूक लढवत आहे. सर्वाना बरोबर घेत काम करणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी सांगितले.

सुवेंद्र गांधीचे शक्ती प्रदर्शन

स्व.दिलीप गांधी प्रेरित सहकार पॅनलच्या सर्वच्या सर्व 18 उमेदवारांनी काल सकाळी ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात महाआरती केली. यावेळी माळीवाडा ते जिल्हा सहकारी बँके मधील निवडणूक कार्यालयापर्यंत ढोल ताश्यांच्या गजरात मिरवणुकीने जाऊन जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, उद्योजक मोहन मानधना, श्रीमती सरोज गांधी, मर्चंट बँकेचे संचालक अनिल पोखरणा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, सहकार महर्षी सुवालाल गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेचे चेअरमन किरण शिंगी, शिवसेनेचे संजय शेंडगे, मर्चंट बँकेचे माजी चेअरमन महोन मानधना, भगवानराव गंगावणे, मच्छिंद्र म्हसे आदींसह भाजपचे सर्व नगरसेवक व विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होत.

बॅँकेतील अनियमिततेमुळे रिर्झव्ह बॅँकेने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. या काळात बॅँक बचाव समिती गठीत झाली. या समितीने निवडणुक रिंगणात उडी घेतली आहे. समितीचे पॅनल प्रमुख म्हणून राजेंद्र गांधी, भाजपचे माजी शहरजिल्हाध्यक्ष अभय आगरकर आणि कॉँग्रसेचे दीप चव्हाण हे करत आहेत.

नगर महापालिका व भिंगार छावणी परिषद मतदारसंघ, (सर्वसाधारण)

ईश्वर बोरा, अनिल कोठारी, संपतलाल बोरा, राहुल जामगावकर, दिपककुमार गांधी, आदेश कोठारी, राजेंद्रकुमार अग्रवाल, अनिल गट्टाणी, शैलश मुनोत, रोनक मुनोत, ईश्वर बारा, संपतलाल बोरा, गिरिष लाहोटी, राजेंद्र गांधी, साईदिप अग्रवाल, राजेंद्रकुमार अग्रवाल, मनोज गुंदेचा, अच्युतराव पिंगळे, प्रकाश कराळे, ज्ञानेश्वर काळे, सुरेश तिवारी, मेहूलकुमार भंडारी, दिपककुमार गांधी, अभय आगरकर, सदाशिव देवगावकर, ज्ञानेश्वर काळे, अक्षय बिहाणी, दत्तात्रय जोशी, राजेंद्र गांधी, दिप्ती गांधी, महेंद्र गंधे, अनिल कोठारी, अजय बोरा, ऋृषभ बोरा, संजय डापसे, दिपक गुंदेचा, राहुल जामगावकर, प्रमोद मोहळे, प्रशांत मुथा, लता लोढा, राहुल लोढा, अतुल शिंगवी.

महिला राखीव

संगीता गांधी, स्मता पोखर्णा (दोन अर्ज), संगिता गांधी, गिता गिल्डा, मनिषा कोठारी, रुपाली लुणिया, पल्लवी बोरा, मंजुषा बोरा, स्मिता पोखर्णा, गिता गिल्डा.

महाराष्ट्र राज्य मतदारसंघ (सर्वसाधारण)

सुर्यभान गर्जे, संजयकुमार भळगट, अजित कटारिया, कमलेश गांधी, संजय छल्लारे, अशोक कटारिया, रमणलाल भंडारी, रुपाली लुणीया, अतुल कासट, अमित कासट, ईश्वरलाल भंडारी, सोमनाथ लोखंडे, प्रतिक मुथा, रसिक कटारिया, सुनिता डागा, अनिल पेचे, सचिन देसर्डा, विलासराव देशमुख, कांतीराम वराळे, रविंद्र कोठारी, सुनील परदेशी, संजय छल्लारे, ईश्वरलाल भंडारी, प्रतिक तलवार, रज्जाक इनामदार, महाविर पटवा, युवराज पाटील.

महाराष्ट्र राज्य मतदारसंघ (महिला)

कल्पना सुरपुरिया, सुनीता डागा, राधिका वराळे, आशा कनार्वट.

अनुसूचित जाती मतदारसंघ

मनेष साठे, नंदा साठे, बाळु कटके, दीप चव्हाण, पोपट साठे, मनेष साठे, नंदा साठे.

राज्याबाहेरल मतदारसंघ

दिनेश कटारिया, नरेंद्र गर्ग.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com