श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

श्रीरामपूर येथील श्रीस्थानकवासी जैन संघ या संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरु असून मतदार यादीवर हरकत घेण्यात आली असून या यादीत मयत झालेले

काही सभासद जिवंत दाखविले आहे. निवडणूक प्रक्रियेत अशा प्रकारचे चुकीचे प्रकार का? असा सवाल अमित मुथ्था यांनी केला आहे.

या निवडणुकीसाठी सभासद यादी जाहीर करण्यात आली असून या यादीत अगोदर सभासद संख्येवरुन समाजातील काही सदस्यांनी हरकत घेतली होती. आता पुन्हा या मतदार यादीत काही सदस्य मयत असताना ते यादीत दाखविण्यात आले आहे. तर काही सदस्य जिवंत असताना मयत दाखविण्यात आले आहे.

28 फेब्रुवारी 2020 रोजीची पहिल्या यादीत काह मयतांची नावे आहेत. त्यानंतर 15 जानेवारी 2021 रोजीची सभासद यादी प्रसिध्द करण्यात आली असून त्यात काही जिवंत असलेले सदस्य मयत दाखविण्यात आले आहे. तर 9 फेबुवारी 2021 रोजी श्रीस्थानक जैन संघ सभासद मतदारांची यादी प्रसिध्द करण्यात आली.

त्यात नं. 342 डुंगरवाल चंद्रकांत फुलचंद 347 नं. डुंगरवाल कमलबाई फुलचंद हे जिवंत असतानाही मतदार यादीत त्यांच्या नावासमोर मयत दाखवले आहे. तर 551 नं. मुथ्था वर्धमान चांदमल व 552 नं. मुथ्था गुलाबबाई चांदमल हे बेनिफिशल दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात हे दोघेही तीन ते चार वर्षापूर्वी मयत झालेले आहेत.

त्यामुळे या मतदार यादीवर अमित मुथ्था यांनी हरकत घेतली आहे. तशी तक्रार या व्यापार्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे. यामुळे आमच्या कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. गेल्या काही दिवसापासून श्रीस्थानकवासी जैन संघ या संस्थेची निवडणूक वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असल्यामुळे आता तर मतदार यादी जिवंत सदस्य मयत दाखवले असून मयत सदस्य जिवंत दाखविण्यात आलेले आहे. यामुळे समाजात हा एक मोठा चर्चेचा विषय ठरणार आहे.