श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

धर्मदाय उपआयुक्त अहमदनगर यांच्या आदेशाप्रमाणे श्रीरामपूर येथील श्री स्थानकवासी जैन संघाच्या विश्वस्त मंडळाचा

पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. जीवन पांडे यांनी दिली.

या निवडणुकीत 1997 व 2018-2019 च्या याद्या ग्राह्य धरल्या जाणार असून श्री स्थानकवासी जैन संघ श्रीरामपूर यांच्या घटनेतील तरतुदीप्रमाणे नऊ विश्वस्तांची निवडणूक गुप्तमतदान पध्दतीने घेण्यात येणार आहे. ही निवडणूक सुमारे 23 वर्षांनंतर होत आहे.

श्री स्थानकवासी जैन संघाच्या सभासदांची प्रारुप मतदार यादी मंगळवार दि. 15 जानेवारी 2021 रोजी जैन स्थानक संघ कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहे. या याद्याबाबत काही हरकती अथवा तक्रारी असतील त्यांनी 25 दिवसांच्या आत त्याचे निवारण करुन तशा दुरुस्त केल्या जातील. अंतिम मतदार यादी ही शुक्रवार दि. 9 फेब्रुवारी 2021 रोजी दु. 3 वाजता प्रसिध्द केली जाणार आहे.

उमेदवारी अर्ज बुधवार दि. 10 फेब्रुवारी 2021 ते सोमवार दि. 15 फेब्रुवारी 2021 सायंकाळी 5 वाजेपर्यंत जैन स्थानक निवडणूक कार्यालयातून घेता येणार आहे. तसेच मंगळवार दि. 16 फेब्रुवारी 2021 ते शनिवार दि. 20 फेब्रुवारी 2021 सायंकाळी 5 वाजेपर्यंत जैन स्थानकात उमेदवारी अर्ज स्विकारले जातील. रविवार दि. 21 फेब्रुवारी 2021 रोजी दु. 4 वा. उमेदवारी अर्जाची छाननी व पात्र उमेदवार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. शुक्रवार दि. 26 फेब्रुवारी 2021 रोजी दु. 3 वाजेपर्यंत उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून अंतिम उमेदवारी अर्ज प्रसिध्द केली जाणार आहे. सोमवार दि. 8 मार्च 2021 रोजी सकाळी 9 वाजेपासून दु. 3 वाजेपर्यंत मतदान घेतले जाणार आहे. 8 मार्च रोजीच सायंकाळी 5 वाजता मतमोजणी व निकाल जाहीर केले जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जीवन पांडे यांनी दिली.

निवडणूक कार्यक्रम

उमेदवारी अर्ज-

16ते 20 फेब्रुवारी

छाननी-21 फेब्रुवारी

अर्ज माघार

26 फेब्रुवारी

मतदान व निकाल

8 मार्च