अहमदनगर (प्रतिनिधी) -

महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक जाहीर होताच चर्चा, बैठकांना जोर आला आहे. दरम्यान सोमवारपासून

प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. महाविकास आघाडीच्या बॅनरखाली शिवसेना- राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र येणार की पुन्हा पहिली राष्ट्रवादी-भाजप युती कायम राहणार याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.

महापालिकेत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याकरीता राष्ट्रवादी-भाजपने हातातहात घातले आहे. आता मात्र भाजपला दूर ठेवून महाविकास आघाडीची मोट बांधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

4 मार्चला होणारी सभापती पदाची आणि जूनमध्ये होणार महापौर पदाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आतापासूनच त्यावर चर्चा सुरू झाल्याचे समजते.

राष्ट्रवादीला सभापती पद देऊन आगामी महापौर पद घ्यायचे असा एक विचार शिवसेनेत सुरू आहे. मात्र हा निर्णय र्स्वस्वी मुंबईतून घेतला जाईल असे सूत्रांकडून सांगण्यात आले. असा निर्णय झाला तर सभापती पदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सभापती पदासाठी राष्ट्रवादीकडून अविनाश घुले यांच्या नावाला संमती मिळाल्याने समजते. शिवसेनेने उमेदवार देण्याची तयारी चालविली असली तरी मुबईतून होणार्या निर्णयाचे पालन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. या राजकीय ओढाताणीत भाजप सत्तेतून बाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.