नऊ उमेदवारी अर्जांवर हरकती

नऊ उमेदवारी अर्जांवर हरकती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी बँकेच्या दाखल केलेल्या नऊ उमेदवारी अर्जावर हरकती नोंदविण्यात आल्या असून, त्यावर बुधवारी सुनावणी घेण्यात आली. बँकेच्या 18 जागांसाठी होत असलेल्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी एकूण 94 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सदर उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्यासमोर करण्यात आली.

निवडणुकीतील वैध उमेदवारांची यादी 8 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे उपनिबंधक आहेर यांंनी सांगितले. छाननीवेळी बँकेच्या माजी संचालकांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेण्यात आली. आरबीआयने या संचालकांना अपात्र ठरविण्याचे आदेश काढलेले असून त्यांचे अर्ज अवैध ठरत असल्याचे हरकतदारांनी हरकतीत म्हटले आहे. तसेच बँकेच्या थकबाकीदार असल्याचा चार ते पाच उमेदवारांच्या अर्जांवर आक्षेप नोंदविण्यात आला आहे. सदर हरकतींवर बुधवारी दुपारनंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली.

अनिल चंदुलाल कोठारी, दिपककुमार अमोलचंद गांधी, राजेंद्रकुमार आत्माराम अग्रवाल, शैलेश सुरेश मुनोत, अजय अमृतलाल बोरा, मनेष दशरथ साठे, अशोक माधवलाल कटारिया, दिनेश पोपटलाल कटारिया, ज्ञानेश्वर कारभारी काळे या उमेदवारांच्या अर्जांवर हरकत घेण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com