निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आंदोलनाचे फार्स करू नका - डॉ.धनवटे

निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आंदोलनाचे फार्स करू नका - डॉ.धनवटे

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा येथील जल स्वराज्य टप्पा 2 यासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते विरोधकांकडून ते निवडणूक डोळ्यासमोरून करण्यात आल्याचे सरपंच व जल स्वराज्य योजनेचे अध्यक्ष डॉ. धनवटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे जल स्वराज्य टप्पा-2 चे डिझाईन चुकीचे झाले, तळ्यामध्ये पडझड झाली परंतु आत्ता 90 टक्के काम व्यवस्थित पूर्ण झालेले आहे. खोदकामातून निघालेला मुरूम दगड हा रस्त्यासाठी वापरण्यात आलेला असून त्यासाठी जीवन प्राधिकरणाची परवानगी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कमिटीच्या अध्यक्षाचे फक्त नियंत्रण ठेवण्याचे काम आहे 17 कोटी 50 लाख या योजनेत कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही. विरोधकांनी आरोप सिद्ध करून दाखवावेत अन्यथा त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार आहे.

गेल्या चार वर्षांपासून ही योजना सुरू आहे. विरोधकांना चार वर्षांपासून जाग का आली नाही. विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून त्यांना राजीनामा मागण्याचा काहीच अधिकार नाही. डीपी आर बदलला गेला नाही. त्यात फक्त दुरुस्ती केली. ही योजना पूर्ण झाल्याशिवाय आपण ताब्यात घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या योजने दरम्यान सहा अभियंता व आठ उप अभियंता बदलले. बाहेरगावी राहणार्‍या नेत्यांनी ही योजना नीट समजून घेऊन गावाच्या विकासामध्ये आडकाठी आणू नये ही योजना व्यवस्थित पूर्णत्वास नेणे अध्यक्ष म्हणून आपले परम कर्तव्य व जबाबदारी आहे.

आम्ही कुठे चुकलो हे विरोधकांनी दाखवून द्यावे. चांगल्या चाललेल्या पुणतांबा ग्रामस्थांसाठी लोकोपयोगी योजनेला खीळ घालण्याचे काम विरोधक करत आहेत. मंत्र्यांनी याची चौकशी करावी. या योजनेत कोणताही गैर व्यवहार व भ्रष्टाचार झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले. जर कोणी दोषी असेल तर दोषी असलेल्या अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी. कोणतेही काम विरोधक करत नाही.

चाललेल्या चांगल्या कामाला फक्त विरोध करणे एवढेच त्यांचे काम आहे. पक्षाच्याच लोकांना त्रास द्यायचा व आपल्या पदाचा गैरवापर करायचा हे सर्व निवडणूक डोळ्यासमोर ठेवून चाललेले आहे. जर आरोप सिद्ध झाले नाही तर आपण आब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे डॉ. धनवटे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com