निवडणुका लांबल्यास हौशी पुढार्‍यांचा हिरमोड होणार!

निवडणुका लांबल्यास हौशी पुढार्‍यांचा हिरमोड होणार!

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

करोनाचा नवा ओमायक्रोन व्हेरीएंट व रद्द झालेले ओबीसी आरक्षण या दोघांच्या फटक्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकांवर संक्रात येण्याची शक्यता असल्याने निवडणुकांसाठी हळद लावून बसलेल्या गाव पुढार्‍यांचा हिरमोड होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

निवडणुका लांबल्यास हौशी पुढार्‍यांचा हिरमोड होणार!
राहाता बाजार समितीत कांदा, सोयाबिनला काय मिळाला भाव वाचा..

स्थानिक स्वराज्य संस्था, साखर कारखाने, बाजार समित्या, नगरपालिका यांच्या मुदती संपल्याने निवडणुका जाहीर होण्याची प्रतीक्षा हौशी कार्यकर्त्यांना लागली आहे. मात्र डबल ओ म्हणजेच ओबीसी आरक्षण व करोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रोन यांच्या सावटाने निवडणुका तात्काळ होण्याची शक्यता कमी झाली आहे. यामध्ये न्यायालयाच्या आदेशाने ओबीसीसाठी असलेले राजकीय आरक्षण स्थगीत करण्यात आले आहे. त्यामुळे आरक्षणासाठी आवश्यक बाबींची पूर्तता होऊन नव्याने आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, असा राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचा सूर आहे. तशा आशयाचा ठरावही विधानसभेत एकमताने करण्यात आला आहे.

निवडणुका लांबल्यास हौशी पुढार्‍यांचा हिरमोड होणार!
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्या उद्घाटन

दुसरीकडे करोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढत आहे. करोनाचा नवा ओमायक्रोनमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने होऊ घातलेल्या निवडणुका तात्काळ होतील याबाबतही साशंकता व्यक्त होत आहे. मात्र बहुतांश ठिकाणच्या निवडणुकीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू होत्या.प्रारूप मतदार याद्या, प्रभागाच्या रचना यामुळे स्थानिक राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली होती. मात्र अचानक या दोन ओच्या सावटामुळे निवडणुका होण्याबाबत प्रश्नचिन्ह तयार झाल्याने निवडणुकांसाठी हळद लावून बसलेल्या गाव पुढार्‍यांचा हिरमोड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

निवडणुका लांबल्यास हौशी पुढार्‍यांचा हिरमोड होणार!
31 डिसेंबरला रात्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनासाठी बंद

तालुक्यात राहाता बाजार समिती, गणेश कारखाना, जवळपास साठ विकास सेवा सोसायट्यांची मुदती संपली आहे. जिल्हा परीषद, पंचायत समिती, राहाता व शिर्डी नगर परीषदांच्या मुदती येत्या काही दिवसांत संपणार असल्याने मोठ्या प्रमाणात संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. करोनाचा नवा ओमायक्रोन व्हेरिएंट व रद्द झालेले ओबीसी आरक्षण यामुळे निवडणुका लांबण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com