निवडणूक आयोगाने निवडणुकांचा तमाशा केला

बॅलेट पेपरवर मतदान होण्यासाठी जेलभरोचा इशारा
निवडणूक आयोगाने निवडणुकांचा तमाशा केला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केंद्र सरकारने लोकशाहीच्या नावाने तानाशाही तर निवडणूक आयोगाने निवडणुकांचा तमाशा केला असल्याचा आरोप इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम मशीन जनआंदोलनाच्या वतीने करण्यात आला आहे. तर देशात जातनिहाय जनगणना व ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान होण्यासाठी जन आंदोलन उभारुन जेलभरो करण्याचा इशारा जालिंदर चोभे मास्तर यांनी दिला आहे.

राजकीय विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ईव्हीएम हटाव व जातनिहाय जनगणना करण्यासंदर्भात आग्रही भूमिका घेतल्यास सत्ताधारी आणीबाणीची घोषणा करतील. मोदी सरकारच्या कार्यकाळात केवळ हिंदुत्वाचा गाजावाजा केला पण हिंदूसाठी त्यांनी काही केले नसल्याचा आरोप चोभे यांनी केला आहे.हिंदुत्वाच्यानादी लावून मुसलमानाविषयी द्वेष वाढवून हिंदू जनतेला गुलाम, गरीब, कंगाल, करतील मुसलमानाचे नाव आणि हिंदूवर घाव घातला जात असल्याचे चोभे यांनी म्हटले आहे.

ओबीसी, साळी, कोळी, माळी, मराठी आणि वंजारी समाजाने सावध होऊन ईव्हीएम विरोधी भूमिका घ्यावी अन्यथा 2024 चे संसदेच्या निवडणुकमध्ये मोदी पुन्हा सत्ताधारी ईव्हीएममुळे होतील. पनामा पेपरप्रकरण, पोगॅसेस घोटाळा, हिंडेन बर्ग रिपोर्ट, बीबीसी डॉक्युमेंटरीमुळे सत्ताधार्‍यांच्या प्रगतीचा फुगा फुटला आणि अनेक गुंतवणूकदारासह एलआयसी एसबीआय सारख्या वित्तीय संस्था बँकांचे दिवाळे निघण्याची वेळ आलेली आहे. त्यातच इस्राईली कंपनीने 30 देशातील इलेक्शन मशीन कसे हॅक केले? याचेही स्पष्टीकरण आले असतांना भारतीय राजकीय पक्ष निवडणूका जिंकण्याचे तारे तोडून ताशे बढवीत आहेत.

जिथे जिथे व्हीव्हीपॅट लावले होते तेथे ईव्हीएम व्हीव्हीपॅटचे मॅचिंग न करता निकाल घोषित केले असे अनेक गैरप्रकार सर्वांना माहित असताना निवडणूक आयोगाने निवडणुकांचा तमाशा केला असतांना सर्व विरोधक, समाजसेवक, विचारवंतांनी एकत्रितपणे रस्त्यावर लढाईसाठी सज्ज होऊन जेलभरो करण्यासाठी निवडणूक आयोगाला घेराव करून निवडणूक आयोगाची आणि ईव्हीएमची हकालपट्टी केली तर 2024 च्या निवडणुकांमध्ये लोकशाही वाचणार असल्याचे चोभे यांनी स्पष्ट केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com