ऊस तोडण्यास विरोध केल्याने वृद्ध महिलेस मारहाण

खोकरच्या माजी उपसरपंचासह सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल
ऊस तोडण्यास विरोध केल्याने वृद्ध महिलेस मारहाण

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथे ऊस तोडू नका म्हटल्याचा राग येवून झालेल्या हाणामार्‍यात खोकर येथील वृद्ध शेतकरी महिला जखमी झाली. जखमी महिलेवर साखर कामगार हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहे. याप्रकरणी खोकर येथील माजी उपसरपंचासह सहा जणांविरूद्ध श्रीरामपूर तालुका पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खोकर गावालगत गट नं. 159 मधील शेतावरून कुळाची शेती असलेले रासपचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय कचरे कुटंबियांचे किशोर काळे यांचसोबत न्यायालयीन वाद सुरू आहेत. किशोर काळे यांनी काही महिन्यापुर्वी ही जमीन खरेदी केली आहे. परंतू येथे उभ्या असलेल्या ऊसाच्या पिकावरून हा वाद झाला असल्याची चर्चा खोकर गावात सुरू आहे.

दि. 28 च्या पहाटे शेतातील ऊस तोडणीवरून वाद झाला. त्यात कचरे यांच्या 80 वर्षाच्या आई इंदूबाई कचरे यांना खोकर येथील किशोर पांडूरंग काळे, माजी उपसरपंच नानासाहेब मच्छिंद्र काळे, दिनकर मच्छिंद्र काळे, कैलास सिताराम भणगे, श्रीकांत जगन्नाथ भणगे यांनी लाथाबुक्क्याने छातीत, पाठीत, पोटात मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद इंदुबाई तुकाराम कचरे यांनी तालुका पोलिसांत दाखल केली आहे. दि. 28 च्या पहाटे चार वाजेच्या सुमारास वरील लोक ऊस तोडणीसाठी ट्रॅक्टरसह आले व ऊस तोडणी सुरू केली हा आवाज आल्याने आम्ही तिकडे गेलो असता, तुम्ही ऊस का तोडत आहात? असे विचारले असता किशोर काळे यांनी ‘तुझा ताबा संपला आहे. तु बांधावरून तिकडे जा, इथे थांबायचे नाही’ असे म्हणाले. त्यावर आम्ही विरोध केला असता मला खाली पाडून लाथाबुक्क्याने मारहाण केली तसेच किशोर काळे यांनी माझ्याकडे बंदूक आहे, मी तुला गोळी घालून ठार मारून टाकीन अशी धमकी दिली असल्याचे इंदुबाई कचरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी तालुका पोलीसांत गुन्हा र. नं. 150/2021 भादंवि कलम 143, 147, 149, 323, 504 व 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरिक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक पिनु ढाकणे पुढील तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com