वृध्दाची गळफास घेत आत्महत्या

वृध्दाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राहत्या घरात वृध्दाने गळफास घेत आत्महत्या (Elderly Man Suicide) केल्याची घटना अहमदनगर शहरातील चितळे रस्त्यावर (Chitale Road) शनिवारी सकाळी उघडकीस आली. सुभाष ज्ञानोबा पाठक (वय 72 रा. चितळे रोड) असे आत्महत्या (Suicide) केलेल्या वृध्दाचे नाव आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चितळे रस्त्यावरील नगर वाचनालयासमोर असलेल्या पाठक यांच्या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर सुभाष पाठक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना राजकुमार प्रभाकर पाठक यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सुभाष पाठक यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना (Topkhana Police) मिळताच सहायक पोलीस निरीक्षक जे. सी. मुजावर, पोलीस अंमलादार शिरसाठ, शेख, भरते यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुभाष यांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली याचा शोध पोलीस घेत आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार दत्तात्रय शिरसाठ करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com