एकरुखेत पेट्रोल टाकून दुकान पेटविले

एकरुखेत पेट्रोल टाकून दुकान पेटविले

एकरूखे |वार्ताहर| Ekrukhe

राहाता तालुक्यातील येथील एकरुखे येथे अज्ञात व्यक्तींकडून एकरुखे-पिंपळवाडी रोडलगत असलेल्या जनरल स्टोअर रात्री 2 च्या सुमारास पेट्रोल टाकून जाळल्याची घटना घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाला आहे. यासंदर्भात जनरल स्टोअर चालक अविनाश पोपट कुंदे यांनी राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

एकरुखे येथील पिंपळवाडी रोडवरील जिल्हा परिषद शाळेसमोर अज्ञात दोन व्यक्तींनी राहात्याकडून पल्सर गाडीवडून येवून अविनाश कुंदे यांचे जनरल स्टोअर्स पेट्रोल टाकून पेटवून दिले. शाळेच्या गेटसमोर आपली मोटारसायकल उभी करून त्यातील एका व्यक्तीने दुकानाकडे जाऊून पेट्रोल फेकून दुकानाला आग लावली. या आगीचा मोठा भडका झाला. या जनरल स्टोअरमध्ये असलेले सामान वह्या, पुस्तके, गोण्या, इतर शालेय उपयोगी साहित्य जाळून खाक झाले आहे. या साधारण 70 हजार रुपयाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे.

असाच प्रकार दोन महिन्यांपूर्वी एकरुखेत घडला आहे. येथील कैलास गायके यांची चहाची टपरी अज्ञात व्यक्तींनी नपावाडी शिवारात नेऊन टाकली होती. अशा प्रकारामुळे एकरुखे येथे व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलेले आहे. त्यामुळे राहाता पोलीस स्टेशनने रात्रीची गस्त चालू करावी, अशी मागणी एकरुखे ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com