ढाकणे यांची व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर बदनामी

सायबर पोलिसांत तक्रार दाखल
ढाकणे यांची व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर बदनामी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई 136 चे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांची व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला बदनामी करणार्‍या विरोधात ढाकणे यांनी सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

एका मोबाईल व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावरुन व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर ढाकणे यांच्या विषयी वैयक्तिक बदनामी करणारा मजकूर व्हायरल करण्यात आला. याप्रकारामुळे समाज माध्यमांमध्ये वैयक्तिक प्रतिमेला हानी पोहचत असल्याने ढाकणे यांनी नगरमध्ये सायबर पोलिस स्टेशनला जात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

राज्य अध्यक्ष म्हणून काम करत असताना अशा प्रकारे बदनामी करणारे व त्यांचे सूत्रधार शोधून काढण्याची मागणी ढाकणे यांनी केली आहे. सरचिटणीस प्रशांत जामोदे म्हणाले की राज्याध्यक्ष ढाकणे आणि मी ग्रामसेवकांचे प्रामाणिकपणे काम करत असताना काही असंतुष्ट लोक विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. येणार्‍या काळात राज्यभरात अशा प्रवृत्तीच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com