...अखेर एकलहरे, रांजणखोल परिसरात वनविभागाकडून पाहणी

त्यांच्या त्रासाला शेतकरी कंटाळले... || काय आहे प्रकार वाचा सविस्तर
...अखेर एकलहरे, रांजणखोल परिसरात वनविभागाकडून पाहणी

टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील एकलहरे (Eklahare) व राहाता (Rahata) तालुक्यातील रांजणखोल (Rajankhol) कार्यक्षेत्रातील वन्य प्राण्यांनी (Wild Animals) विशेष करून रानडुकरांने (Wild Boar) धुमाकूळ घालून शेतकर्‍यांचे पिके फस्त करण्याचा प्रकार चालू आहे. या संदर्भात दैनिक सार्वमतच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर सतत बाजू मांडण्यात आली. त्यास यश आले असून आज सकाळी राहाता वनविभागाने (Forest Department) रांजणखोल परिसरात शेतकर्‍यांच्या बांधावर येऊन झालेल्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. तर आज संध्याकाळपासून या रानडुकरांची (Wild Boar) शोध मोहीम राबविण्यात येणार असल्याचे वन विभागाच्यावतीने (Forest Department) सांगितले गेले.

...अखेर एकलहरे, रांजणखोल परिसरात वनविभागाकडून पाहणी
सहा प्राथमिक शिक्षक निलंबित

परिसरात जंगली प्राणी, रानडुक्कर, हरीण, कोल्हे हे रात्रीच्या वेळी शेतात येऊन पिकांची नासाडी करत आहेत. सदर प्राणी उभ्या झाडांना मोडून ऊस, ज्वारी, मका, सह आदी पिकांचे मोठे नुकसान करत आहे. या पाहणी वेळी बाळकृष्ण गिरमे, अनिल साळुंके, मजीद शेख, रवी निर्मळ, आकाश गिरमे, आदेश गिरमे, रय्यान शेख, मलिक जहागीरदार, खलीक जहागीरदार, सुलेमान शेख, खरपसे सह परिसरातील शेतकरीवर्ग उपस्थित होते.

...अखेर एकलहरे, रांजणखोल परिसरात वनविभागाकडून पाहणी
15 जानेवारीअखेर देशात 160 लाख टन साखरेचे उत्पादन
...अखेर एकलहरे, रांजणखोल परिसरात वनविभागाकडून पाहणी
माळीवाडा बसस्थानकात तीन अतिरेकी घुसले.. पोलिसांनी पकडले! पण...
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com