श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे कार्यक्षेत्रातील आठवाडी शिवारात गेल्या मंगळवारी गुलाबाच्या बागेलगत

असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये पोलीस यंत्रणेने अर्धा कोटी रुपयांचा गुटखा साठा जप्त केला त्याच भागातील एका बंद खोलीत गुटखा असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना मिळताच तात्काळ पोलीस पथकाने बंद खोलीची तपासणी करताच 11 लाख 66 हजारांचा गुटखा सुगंधी तंबाखू मिळून आल्याने

परिसरातून मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने गुटख्याची विक्री, साठा, वाहतूक, वितरण सुरूच असल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, याप्रकरणी पोलिसांनी करीम आजम शेखला गजाआड केले आहे.

सुरुवातीला पकडण्यात आलेल्या सलमान तांबोळी कडून पोलिसांना ही माहिती मिळाली. तर पोलिसांनी आतापर्यंत राहाता तालुक्यातील निमगाव परिसरातील साहिल विजय चोपडा, वैभव शांतिलाल चोपडा या दोघा चुलत्या पुतण्यांसह लोणीतून फिरोज पठाण अशा चौघांना विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केलेली असून त्यांच्या पोलीस कोठडीत पुन्हा दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

तर पोलीस प्रशासनाने याच प्रकरणातील तपासात संगमनेर कनेक्शन उघड झाल्याने संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील पोल्ट्री फॉर्ममध्ये छापा टाकून लपविलेल्या गुटख्यासह एकूण 20 लाखांचा मुद्देमाल रविवारी जप्त केला होता.

सुरुवातीला गुलाबाच्या बागेलगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अवैध गुटखा सापडला त्या ठिकाणच्या मालकाचा शोध लावताना पोलीस यंत्रणा चक्रावली गेली.

प्रथमदर्शनी छाप्याच्या ठिकाणच्या लगत एका निवृत्त पोलीस कर्मचारी, माजी एस टी डोपोच्या कर्मचार्यासह शेती महामंडळ व एका भटक्या विमुक्त जातीच्या व्यक्तीचे क्षेत्र असल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर पोलीस प्रशासनाने राज्य शेती महामंडळाच्या टिळकनगर स्टेट फार्मिंग सोबत पत्रव्यवहार केला. त्यानुसार शेती महामंडळाने छापा ठिकाणच्या भागांची पाहणी करून सदर क्षेत्र अतिक्रमण नसल्याचा पोलिसांना अभिप्राय दिला आहे. छापा ठिकाणच्या क्षेत्र भटक्या विमुक्त जातीच्या व्यक्तीने निवृत्त एस. टी. डेपोतील कर्मचार्याचा भाऊ करीम आजम शेखला करारनामा करून दिला असल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे.

याप्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, डी. वाय.एसपी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट गुटखा प्रकरणाचा तपास जलदगतीने करीत असून. आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी फरार आहे. ज्याठिकाणी छापा पडला होता, त्या ठिकाणचा मालक आता उजेडात आला असून,

जागा मालकाचा संबंधित गुटखा प्रकरणात सहभाग कोणत्या प्रकारे होता किंवा त्यासोबत कोण कार्यान्वित होते. तसेच ज्याठिकाणी गुटखा सापडला आहे त्याठिकाणाहून माल कुठेकुठे व कोण पोहोच करीत असे ? आता या प्रकरणात मोठमोठे मासे गळाला लागण्याची शक्यता असून, लवकरच गुटखा प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.