एकलहरेच्या माजी तंटामुक्ती अध्यक्षांच्या घरी चोरी

स्थानिक युवकांसोबत चोराची झटापट
एकलहरेच्या माजी तंटामुक्ती अध्यक्षांच्या घरी चोरी

टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar

तालुक्यातील एकलहरे कार्यक्षेत्रातील जवाहरवाडी येथे मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास एकलहरे तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष सिराज आलम शेख यांच्या राहत्या घरी चोरट्यानी दरवाज्याच्या कडी कोयंडा तोडून चोरी केल्याने एकच खळबळ उडाली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

माजी तंटामुक्ती अध्यक्ष हे आपल्या परिवारासह गेल्या तीन दिवसापासून अहमदनगरला काही कामानिमित्त गेले असता मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास माजी अध्यक्षांच्या घराशेजारी असलेल्या युवक प्रवीण मिसाळला रात्री तोडफोडीचा आवाज येत असल्याचे ऐकायला आले. प्रवीण घराबाहेर आला असता एक चोरटा घराशेजारील सायकलीचा स्टँड तोडून अध्यक्षांच्या घराच्या समोरील बाजूच्या दरवाजा तोडत असल्याचे निदर्शनास आले, लगेचच प्रवीणने वाडीवरच राहण्यार्‍या आपला जोडीदार लहानू मोरे, कमलाकर मोरे, संजय पारखे आदींना मोबाईल द्वारे संपर्क करून चोरटे आल्याचे सांगितले.

काहीवेळातच येथील चार ते पाच युवक घटनास्थळी पोहचले व लहानू मोरेचे वडील जंगलु मोरे घराच्या दारासमोर आले असता इकडे कोणीच नसल्याचे सांगितले. मात्र चोरटा घरात असल्याने चोरट्याने बाहेर लोक जमल्याचे लक्षात येताच बाहेरील अंदाज घेऊन दरवाजा उघडला. चोर जोरात पळायला लागला येथील युवकांनी आरडाओरडा करून चोरट्याचा पाठलाग केला व काही मिनिटे चोराची व प्रवीणची झटापट झाली मात्र अंधाराचा फायदा घेत चोर जांभूळ बागेतून पळून गेला.

सकाळी प्रविणने माजी अध्यक्षांना याबाबत माहिती दिली असता अध्यक्ष नगरहून तात्काळ घटनास्थळी आले असता घराच्या कपाटामधून 5 ते 6 हजार रोख रक्कम चोरीला गेली असल्याचे सांगितले. घटनेची माहिती बेलापूर पोलिसांनी देण्यात आली असून पुढील तपास चालू आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com