दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये आठ लाख लांबविले

कुठे घडल्या घटना ?
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये आठ लाख लांबविले

अहमदनगर|Ahmedagar

शहरातील तोफखाना (Topkhana) व कोतवाली पोलीस ठाणे (Kotwali Police Station) हद्दीत मंगळवारी दुपारी चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून आठ लाख रूपयांची रोख रक्कम लंपास झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोन्ही पोलीस ठाण्यात (Police Station) दोन्ह स्वतंत्र गुन्हे दाखल (Crime filed) झाले असून शहर पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

मंगळवारी दुपारी सादीक शेख (रा. गोविंदपुरा) हे त्यांच्याकडील पाच लाख रूपयांची रक्कम दुचाकीच्या डिक्कीमध्ये घेऊन नगर-मनमाड रोडवरील (Nagar-Manmad Road) कोटक महिंद्र बँकेमध्ये भरण्यासाठी गेले होते. बँकेत (Bank) जाण्यापूर्वी त्यांनी बँकेजवळील एका हॉटेलच्या बाहेर दुचाकी उभी केली. ते हॉटेलमध्ये जाताच चोरट्यांनी डिक्कीचा लॉक तोडून त्यातील पाच लाखांची रोकड लंपास केली. शेख हॉटेलमधून (Hotel) बाहेर आल्यानंतर चोरीची घटना त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ तोफखाना पोलिसांना (Topkhana Police) घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ( CCTV Footage) ताब्यात घेतले आहे. शेख यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. दुसरी घटना कोतवाली पोलीस ठाणे (Kotwali Police Station) हद्दीत बुरूडगाव रोडवरील तिर्थकार कॉलनीमध्ये घडली. अशोक शिवलाल गांधी (वय 74 रा. बुरूडगाव रोड) यांनी मंगळवारी दुपारी मार्केट यार्ड येथील मर्चंट बँकेतून तीन लाख रूपयांची रक्कम काढली. ती रक्कम एका बॅगमध्ये घेऊन ते कारने घराकडे गेले. तिर्थकार कॉलनीमध्ये कार आल्यानंतर रक्कम असलेली बॅग त्यांनी कारमधून बाहेर काढली. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गांधी यांच्या हातातील बॅग बळजबरीने हिसकावून धूम ठोकली.

चोरट्यांनी हेल्मेट घातलेले होते. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, शहर पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, कोतवालीचे निरीक्षक संपत शिंदे, सहायक निरीक्षक विवेक पवार, उपनिरीक्षक मनोज कचरे यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी भेट दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक कचरे करीत आहे. शहरात भर दिवसा चोरीच्या घटना घडल्यामुळे व्यावसायिकांमध्ये खबराट पसरी असून पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे ठाकले आहे.

Related Stories

No stories found.