शिर्डी विमानतळावर गुरुवारी आठ विमान फेर्‍या

दररोज 32 विमानसेवा सुरु करण्याचा प्रयत्न
शिर्डी विमानतळावर गुरुवारी आठ विमान फेर्‍या

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

काकडी (Kakadi) येथील शिर्डी विमानतळावर (Shirdi Airport) गुरुवारी चार येणारी व चार जाणारी अशा आठ विमानांच्या फेर्‍या (Airplane Rounds) शिर्डी विमानतळावरुन (Shirdi Airport) गुरुवारी झाल्या आहेत. भविष्यात या विमानतळावरुन 16 येणारी व 16 जाणारी अशा 32 विमानफेर्‍यांचे उद्दीष्टसाध्य करण्याचे आम्ही ठेवले असल्याची माहीती महाराष्ट विमानतळ विकास प्राधिकरणचे (Maharashtra Airport Development Authority) व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष दिपक कपुर यांनी दिली आहे.

तिन दिवसापुर्वी दृष्यमानतेच्या (Visible) कारणाने येथील काही विमाने इतर विमानतळावर उतरविली तर काही उड्डाणे रद्द (Flights canceled) झाली होती. तिन दिवस दृष्यमानतेची आडचण निर्माण झाली होती. मंगळवार पासुन येथील विमानसेवा पुन्हा सुरु झाली आहे. गेल्या अठरा महीन्यापासुन बंद असलेली विमानसेवा 10 ऑक्टोबरपासुन सुरु झाली त्यात मध्येच आडचण आली. साईभक्तांची मोठी पंसती सध्या मिळत असल्याने या विमानतळाच्या विमानांना चागंली गर्दी होत आहे.

गुरुवारी दोन दिल्ली (Delhi) एक बेंगलुरू (Bengaluru), एक चेन्नई (Chennai) वरुन विमाने आली परत गेली. मागे लॅाकडाउनमुळे विमानतळ बंद होण्याच्या अगोदर या विमानतळावरुन 14 विमाने येत होती व14 विमाने जात होती. आता त्यातही वाढ करण्याचा मानस विमानतळ विकास प्राधिकरणचा आहे. 28 वरुन 32 पर्यंत नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com