देवगाव येथे आठ दिवसांचा जनता कर्फ्यू

देवगाव येथे आठ दिवसांचा जनता कर्फ्यू
संग्रहित

देवगाव (वार्ताहर) - नेवासा तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये 23 ते 30 मे 2021 पर्यंतच्या कालखंडामध्ये आठ दिवसांचा कडक जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

या कालखंडामध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सुनीता विष्णू गायकवाड यांनी दिली.

जनता कर्फ्यू दरम्यान अत्यावश्यक सेवेतील दवाखाने, मेडिकल्स, स्वस्त धान्य दुकान, दूध संकलन केंद्र, पिठाची गिरणी वगळता गावातील सर्व दुकाने 100% बंद राहणार आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com