सार्वमत

नेवाश्यात मुस्लिम बांधवांनी घरीच साजरी केली ईद

मुस्लिम बांधवांनी शासनाचे नियम पाळत घरातच नमाज़ अदा केली

Nilesh Jadhav

नेवासा | तालुका वार्ताहर | Newasa

नेवासा शहरात बकरी ईद मुस्लिम बाधवांनी घरी साजरी केली. देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदाच खुपटी रोड वरील ईदगाह मैदान रमज़ान आज बकरी ईदच्या महत्वाच्या सण असतांना देखील ओस पडलेली दिसत होती.

मुस्लिम बांधवांनी शासनाचे नियम पाळत घरातच नमाज़ अदा केली. बकरी ईदच्या निमित्ताने नेवासा शहरात प्रत्येक ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंजीत डेरे, पीएसआय वाघ, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत भराट, संभाजी गर्जे, कुंडारे, शिंदे, कुऱ्हाडे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com