‘ईद’च्या पार्श्वभूमीवर नेवाशात पोलिसांचे पथसंचलन व दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक

‘ईद’च्या पार्श्वभूमीवर नेवाशात पोलिसांचे पथसंचलन व दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक

नेवासा |तालुका वार्ताहर|Newasa

‘ईद’च्या (Eid) पार्श्वभूमीवर नेवासा पोलिसांनी (Newasa Police) शहरातून पथसंचलन व नेवासा बस स्थानक (Newasa Bus Stand) परिसरात दंगा नियंत्रणाचे प्रात्यक्षिक (Demonstration of Riot Control) केले.

पोलिसांनी बस स्थानक (Bus Stand) परिसराच्या मोकळ्या जागेत दंगा नियंत्रण योजना रंगीत तालीम केली. यावेळी विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाया (Preventive Action), जमाव नियंत्रण आदी बाबींची रंगीत तालीम करण्यात आली. नेवासा पोलीस ठाण्यापासून (Newasa Police Station) पथसंचलनाला सुरुवात झाली.

बसस्थानक परिसर, गणपती चौक, बाजारपेठ, नगरपंचायत चौक, नायकवाडी मोहल्ला, राम मंदिर, जुने कोर्ट, ते मुख्य बाजार पेठ अशा पद्धतीने हे पथसंचलन झाले. नायब तहसीलदार श्री. सानप व पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथसंचलन झाले.

Related Stories

No stories found.