नेवासा (शहर प्रतिनिधी) -

ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पंचायत

समितीच्या माजी सभापती सुनीताताई गडाख यांनी व्यक्त केले.

नेवासा पंचायत समिती आणि खुपटी ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने खुपटी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या उपक्रमांतर्गत ‘महिला सक्षमीकरण मेळावा’ घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे होते.

महिलांच्या प्रगतीसाठी त्यांना स्वयंनिर्णय घेण्याचा अधिकार मिळाल्यास त्या सर्व क्षेत्रात निर्भयपणाने अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतील, खुपटी ग्रामपंचायतीने शाळेला दर्जेदार सुविधा पुरविल्याने शाळेच्या गुणवत्तेचा वाढता आलेख तसेच जिल्हास्तरीय गुणवत्ता स्पर्धेत सर्वाधिक बक्षिसे मिळविणे व शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी दिलेले योगदान ही कौतुकास्पद बाब आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आपल्या शाळांना चांगल्या सुविधा द्याव्यात असा आशावाद सुनीता गडाख यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रवेशद्वाराच्या सुशोभीकरणाचे उद्घाटन सौ. गडाख यांच्याहस्ते झाले. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला अभ्यास कट्टा तयार करून दिला. त्याचे तसेच पंचायत समिती सदस्य विक्रम चौधरी यांनी शाळेला दिलेल्या संगणकाचे उद्घाटन सुनीताताई गडाख यांच्याहस्ते झाले. ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगातून दिलेल्या सीसीटीव्ही आणि हायमॅक्सचे उद्घाटन सभापती रावसाहेब कांगुणे यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा तसेच समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंदग्रुपचे संस्थापक गोरखराव तनपुरे, देणगीदार माजी विद्यार्थी तसेच करोनाकाळात कोव्हिड योद्धा म्हणून काम करणार्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, परिचारिका, शिक्षिका, युवक मंडळे यांचा मान्यवरांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.

मेळाव्यास जिल्हा परिषद सदस्य मीनाताई शेंडे, पंचायत समिती सदस्य मीनाक्षी सोनवणे, सुषमा खरे, विक्रम चौधरी, सरपंच राजश्री तनपुरे, गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे, अधीक्षक हेमलता गलांडे, शिवाजी कराड, रेणुका चन्ना, विद्या सुंबे, केंद्रप्रमुख मीरा केदार, भागवत वाकचौरे, अशोक घाडगे, नवनाथ फाटके, शशिकांत कार्ले, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तुकाराम कार्ले, उपाध्यक्ष संजय घोरपडे, संभाजी कार्ले, भानुदास चौधरी, पोपटराव वरुडे, जगदीश चौधरी, गुलाब चौधरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक सुलोचना पटारे यांनी केले. आभार मुख्याध्यापक बाबाजी सांगळे यांनी मानले .सूत्रसंचालन डॉ. रेवणनाथ पवार यांनी केले. याप्रसंगी करोना काळात शिक्षकांनी राबवलेल्या उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाला तालुक्यातील शिक्षिका, मुख्याध्यापक, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.