शिक्षणाधिकारी पाटील पुढील आठवड्यात होणार हजर

शिक्षणाधिकारी पाटील पुढील आठवड्यात होणार हजर

जळगावहून झाले कार्यमुक्त

अहमदनगर (प्रतिनिधी)

नगर जिल्हा परिषदेत गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असणारे प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर जळगाव जिल्हा परिषदेतून बी.जे. पाटील हे पुढील आठवड्यात हजर होणार आहेत.

पाटील यांची महिनाभरापूर्वी नगर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी पदावर बदली झाली होती. मात्र, तांत्रिक कारणामुळे नगरला हजर झाले नव्हते. शिक्षणाधिकारी पाटील यांनी जळगाव जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी पदाचा भार शुक्रवारी सोडला असून पुढील आठवड्यात ते नगर जिल्हा परिषदेत हजर होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Related Stories

No stories found.