स्थानिक प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना - ना. वर्षा गायकवाड

स्थानिक प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना - ना. वर्षा गायकवाड
वर्षा गायकवाड

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

सध्या सुरु असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांची तपासणी (Cheking of students in schools) स्थानिक आरोग्य विभागाने (Local Health Department) केलेली आहे. राज्य सरकार येणार्‍या संकटाबाबत गंभीर असून पूर्णपणे लक्ष ठेवण्यात आले आहे. संभाव्य धोक्यांचा अंदाज घेवून स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना (Alerts to Local Administration) देण्यात आल्या आहेत. कोविडचे (Covid 19) संक्रमण वाढल्यास स्थानिक प्रशासनास शाळा बंद करण्याचे अधिकार देण्यात आल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले.

शाळा सुरु आहेत, अशा वेळेला विद्यार्थ्यांना करोनाची लागण होवू नये यासाठी स्थानिक पातळीवर खबरदारी घेतली जात आहे. जर एखाद्या शाळेत करोना संक्रमीत विद्यार्थी (Covid 19 Positive Student) आढळून आला तर त्याला विलगीकरण कक्षात ठेवून तात्काळ उपचार मिळणार आहेत. तसेच शाळेतील इतर विद्यार्थ्यांचीही तपासणी करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाने करावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत. आमची एसओपीमध्ये (SOP) आम्ही स्पष्ट सूचना केल्या आहेत. सरसकट बंदचा निर्णय घेतला जाणार नाही. राज्य सरकारने स्पष्ट केले आहे स्थानिक पातळीवर उपाययोजनेबाबत निर्णय घ्यावेत.

तर मुलींचे मतदानाचे वय 18 वरुन 21 करण्याच्या प्रश्नावर ना. गायकवाड म्हणाल्या, केंद्राने 33 टक्के महिलांना आरक्षण (Women Reservation) मिळावे याबाबत निर्णय घ्यावा, ज्या लोकसंसदेत कायदे बनतात तेथेच हे निर्णय घेतले गेले पाहिजे. युपीए सरकारने महिलांच्या बाबतीत चांगले निर्णय घेतले होते. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ यावरील खर्च कुठे जातो हे पाहिले पाहिजे. देशात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. महिलांना सुरक्षीत करण्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घेण्याची गरज आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com